Aalandi

सिध्दबेटात माऊली मंदिरातील पुरातन सुवर्ण पिंपळ वृक्षाचे बीज वृक्षारोपण

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आळंदी येथील संत लीलाभूमी आळंदी सिद्धबेट येथे आळंदी नगरपरिषद, आळंदी जनहित फाऊंडेशन, सार्वजनिक वनीकरण विभाग, वन विभाग यांचे माध्यमातून विविध सेवाभावी व्यक्ती, पर्यावरण प्रेमी संस्था यांचे माध्यमातून ५५ देशी वृक्षांचे वृक्षारोपणा संयोजक अर्जुन मेदनकर यांचे हस्ते करण्यात आले. आळंदी माऊली मंदिरातील वैभवी पुरातन सुवर्ण पिंपळ वृक्षाचे बीज संकलन केलेल्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या सुवर्ण पिंपळ रोपे वृक्षांचे आळंदी सिध्दबेटात वृक्षारोपण करण्यात आले.
सुवर्ण पिंपळ रोपे वृक्षांचे आळंदी सिध्दबेटात वृक्षारोपण.

जागतिक पर्यावरण दिनी सामाजिक बांधिलकीतून वनपरिक्षेत्र अधिकारी खेड सार्वजनिक वनीकरण विभाग अनिल लांडगे, आळंदी जनहित फाउंडेशन यांचे मार्गदर्शनात उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी सा. वनी खेड वनपाल गुलाब मुके, वनरक्षक सा. वनी खेड सोपान अनासुने, वनसेवक बाळासाहेब कोहीणकर, दत्ता कारले, संयोजक आळंदी शहर पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन अध्यक्ष शिवाजी जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष योगेश जाधव, शशिकांराजे जाधव, बाबुराव नागरगोजे, मारुती साळुंखे, डी. वाय. पाटील कॉलेज एनसीसी विभाग प्रमुख दिलीप घुले, योगेश महाराज वाघ, रोहिदास कदम, उमेश बिडकर, बाबासाहेब भंडारे, राम गोरे, विश्वभर पाटील, ओंकार पवार, कैलव्य टोणपे, मयूर गिल यांचेसह पांडुरंग महाराज शितोळे वारकरी साधक उपस्थित होते. आळंदी पंचक्रोशीत एक लक्ष वृक्ष लावण्याचा संकल्प आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे. या उपक्रमाचा भाग म्हंणून जगातील पर्यावरण दिनी वृक्षारोपण करीत पर्यावरण संविधानाचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी आळंदी माऊली मंदिरातील वैभवी पुरातन सुवर्ण पिंपळ वृक्षाचे बीज संकलन केलेल्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या सुवर्ण पिंपळ रोपे वृक्षांचे आळंदी सिध्दबेटात वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी सार्वजनिक वनी विभागाने विशेष प्रयत्न घेतले. माऊली मंदिराचे व्यवस्थापक माऊली वीर, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सा. वनी विभागाकडे सुमारे आठ पोती बीज सुपूर्द केले होते. यापासून तयार केलेल्या वृक्षांचे मोठ्या उत्साहात जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करण्यात आले. सुवर्ण पिंपळासह आंबा, कडुलिंब, रिठा, करंज वृक्षांचे रोपण करीत स्वच्छ, सुंदर, हरित आळंदीसाठी उपक्रम राबविण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून आळंदी सिद्धबेट येथे वृक्षारोपण करून वनराई वाढविण्यात आली आहे. यापुढील काळात अधिक वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले जाणार आहे. वृक्षारोपण प्रसंगी उपक्रमातील सा. वनी खेड वनपाल गुलाब मुके, वनरक्षक सा. वनी खेड सोपान अनासुने यांचा सत्कार करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिन हा सर्वानी एक सण म्हणून पर्यावरण दिन साजरा करून प्रदूषण मुक्त आळंदी यासाठी कार्य करावे असे आवाहन आळंदी शहर पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष, वृक्ष मित्र संयोजक अर्जुन मेदनकर यांनी केले. पंचमहाभूतांचे पुजारी होऊन अग्नि, जल, वायू, आकाश, पृथ्वी वरील सजीव सृष्टीचा मुख्य गाभा असलेला सूर्य सर्वाना वंदनीय आहे. सर्वानी कार्बन ने झिरो साठी प्रयन्त करण्याची गरज असून जागतिक पर्यावरण दिना निमित्त आपण सर्वानी प्रदूषण मुक्त परिसरासाठी संकल्प करू या असे आवाहन संयोजक अर्जुन मेदनकर यांनी केले. यावेळी भागवत काटकर यांनी मनोगत व्यक्त करून वृक्ष संवर्धनास आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!