अंढेरा (हनिफ शेख) – लग्नाचे आमिष दाखवून मावस बहिणीस पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. रंजीत किसन पारवे असे या नराधमाचे नाव आहे. विशेष म्हणजे, या खटल्यात स्वतः पीडिता व तिची फिर्यादी आई या फितूर झाल्या होत्या. परंतु, त्यांच्या उलट तपासणीतून पुरेसे पुरावे मिळाल्याने आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध झाला. अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या शेळगाव आटोळ गावात २०१६ मध्ये ही नृशंस घटना घडली होती. अल्पवयीन असलेल्या मावस बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणार्या आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणार्या लिंगपिसाट मावस भावाला अखेर जिल्हा न्यायालयाने अद्दल घडवली आहे. विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी भक्कमपणे केलेला युक्तीवाद प्रकरणाला बळ देणारा ठरला.
शेळगाव आटोळ येथील एका १६ वर्षीय मुलीस आरोपी रंजीत किसन पारवे याने लग्नाचे आमिष दाखवनू पळवून नेले होते. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मावसभाऊ असलेल्या रंजीत पारवेविरुद्ध अंढेरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला गेला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुंढे यांनी करून दोषारोपपत्र बुलढाणा येथील विशेष न्यायालयात दाखल केले होते. विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांनी या प्रकरणी सरकारी पक्षाची बाजू मांडली. सरकारी पक्षाकडून १० साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी आणि तिची आई फितूर झाली होती. तरीही त्यांच्या उलट तपासात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्धा होईल इतपत पुरावा मिळाला होता. त्यामुळे, जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी रंजीत किसन पारवे यास दहा वर्षांचा सश्रम करावासाची शिक्षा ठोठावली. यामध्ये कलम ३६३ नुसार तीन वर्षे शिक्षा व एक हजार रूपये दंड. दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी शिक्षा़ तसेच कलम ३६६ नुसार पाच वर्षांची कठोर शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी शिक्षा, पोक्सो कायद्याच्या कलम ६ नुसार १० वर्षांची कठोर शिक्षा व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी शिक्षा तसेच कलम ३७६(२)(जे)(एन) नुसारसुद्धा शिक्षा सुनावली गेली आहे. पोक्सो कायद्याच्या कलम १० नुसार सुद्धा आरोपीस शिक्षा ठोठावली गेली आहे. परंतु, पोक्सो कलम ६ नुसार शिक्षा दिल्यामुळे स्वतंत्र शिक्षा देण्यात आली नाही. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अॅड़ संतोष खत्री यांनी कामकाज पाहलिे तसेच त्यांना कोर्ट पैरवी हेकॉ सुरेश मोरे पोलीस स्टेशन अंढेरा यांनी सहकार्य केले.
लग्नाच्या आमिषाने घरून पळवून नेत केला होता अत्याचार
फिर्यादीने पोलिस ठाणे अंढेरा येथे ३ जून २०१६ रोजी फिर्याद दिली होती, की अंदाजे वीस ते पंचवीस दिवसापूर्वी ते घरी झोपलेले असतांना त्यांची मुलगी (वय १६ वर्षे) पीडिता ही घरात आढळून आली नाही. तसेच त्यावेळी त्याच्या मोबाईलवर आरोपी रंजीत किसन पारवे (रा. लोणीखुर्द, ता. रिसोड, जि. वाशिम) याचा फोन आलेला दिसला, त्यावरून त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या नातेवाईकांनी फिर्यादीला सांगितले, की तिच्या मुलीस आरोपीने लग्न करण्याकरिता पळून घेवून गेला आहे. अशी माहिती मिळाल्याने फिर्यादीने आरोपीविरूध्द त्याच्या मुलीस फुस लावून पळून नेल्याबद्दल अशा तोंडीरिपोर्ट व जबाबवरून पो.स्टे. अंढेरा यांनी कलम ३६३, ३६६.ए. ३७६ जे, भारतीय दंडविधानानुसार व सहकलम ३, ४ नुसार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुंढे
यांनी करून आरोपीविरूध्द भरपूर पुरावा मिळून आल्यामुळे दोषारोपपत्र बुलढाणा येथील विशेष न्यायालयामध्ये दाखल केले. तपासात आढळून आले होते की, रंजीतने पीडितेला तिच्या घरामागे बोलाविले होते. नंतर मोटारसायकलवर ते आधी लोणीला गेले, नंतर रिसोड आणि तेथून वाशिम याठिकाणी पोहोचले. तेथून रंजीतने पीडितेला पंढरपूरला घेवून गेला होता. त्याठिकाणी ते एक महिना राहिले. दरम्यान, आरोपीने तेथील द्राक्षबागामध्ये मजुरी केली. दोघांनी लग्नही केले होते, असे समजते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि आरोपीला अटक केली. त्यानंतर सदरचे प्रकरण हे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री बुलढाणा यांचेकडे सरकारपक्षाची बाजू मांडण्याकरीता सोपवण्यात आले. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्पेâ एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी सरकार पक्षाची भक्कम बाजू मांडून न्यायालयामध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार संपूर्ण हकीकत सिध्द केली. तसेच आरोपीने पीडिता ही तिची मावस बहिण असतांनासुध्दा तिला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले व तिच्या सोबत जबरदस्ती शारीरिक संबंध केले. सदर प्रकरणामध्ये पीडितेची आई व स्वतः पीडिता फितूर झाल्या. त्यांनी त्यांच्या बयाणानुसार साक्ष दिली नाही. परंतु, त्यांच्या उलटतपासामधून आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द होईल इतपत पुरावा मिळून आला. त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग-१ आर. एन. मेहर यांनी आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द होत असल्याकारणाने आरोपी रंजीत किसन पारवे यास कलम ३६३ भा.दं.वि. नुसार ३ वर्ष कठोर शिक्षा व १ हजार रूपयाचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिण्याची साधी शिक्षा तसेच कलम ३६६ ए भा.दं.वि. नुसार ५ वर्षाची कठोर शिक्षा व २ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिण्याची साधी शिक्षा तसेच पोक्सो कायदयाचे कलम ६ प्रमाणे आरोपीस १० वर्षाची कठोर शिक्षा व २ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिण्याची साधी शिक्षा तसेच आरोपीस कलम ३७६ (२) (जे) (एन) भा.दं.वि. नुसारसुध्दा शिक्षा ठोठावली परंतु पोक्सो कायदयाचे कलम ६ मध्ये शिक्षा दिल्यामुळे स्वतंत्र शिक्षा या कलमाखाली देण्यात आली नाही.
—————