आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील खेड तालुक्यातील अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन आरोग्य सेवेसह जनजागृती उपक्रमांचे आयोजन विविध ठिकाणी करीत साजरा करण्यात आला, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली. यावेळी हिवतापाची लक्षणे आणि उपाय योजना यांबाबत माहीती देत संवाद साधण्यात आला. हिवताप दिनी माहीती प्रदर्शित करणारे फलक हाती घेवून परिसरातून आरोग्य सेवकांनी रॅली काढत जागृती करण्यात आली. हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली. आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
शहरातील गावातील पाण्याची डबकी गटारे वाहती करण्यास आवाहन करीत टायर, भंगार साहित्य साठवून ठेवू नये, रिकामे न करता येणारे पाणी साठयात गप्पी मासे सोडणे .किंवा जळके ऑईल टाकण्याचे सूचना करण्यात आल्या. घरांची दारे, खिडक्या, व्हेट पाईपला जाळे बसवणे, मच्छरदानीचा वापर करावा, अंग भरूण कपडे वापरावी, परीसर स्वच्छ ठेवावा, घरातील फ्रीज कुलर आठवड्यातून एकदा स्वच्छ करावेत असे आवाहन करण्यात आले. सर्वत्र वातावरणाचे तापमान वाढत असल्याने उष्माघात प्रतिबंध व जनजागृती करण्यात आली.उन्हात दुपारच्या वेळी बाहेरील कामे टाळणे, भरपूर पाणी प्यावे. चक्कर, मळमळ आदी लक्षणे दिसताच तात्काळ नजिकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याच उपक्रमात प्रौढ बी सी जी लसीकरण मोहिम अंतर्गत सर्वे आशा सेविका यांच्या मार्फत करण्यात आला. याबद्दल माहीती देण्यात आली. सर्व नागरिकांना हिवताप, उष्माघात यांपासुन स्वतःचा बचाव आणि उपचार यांबाबत जनजागृती करण्यात आली. यासाठी पुणे जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ सचिन देसाई यांचे मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आल्याचे डॉ. पारखे यांनी सांगितले. या मोहीम आणि उपक्रमास परिसरातून प्रतिसाद मिळाला.
खेड तालुक्यातील कुडे, डेहणे, राजगुरुनगर, शेल पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या उत्साहात जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्वच आरोग्य संस्थानी हिरिरिने भाग घेतला. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, डाॅ धैर्यशिल पंडित, डाॅ विद्यानंद खटके, आरोग्य सहायक संतोष होनावळे, सतिश मोरे, नितिन भुसारी, अजित चौधरी, भुषण भारती या आरोग्य सहायक व सेवक यांनी सक्रिय सहभाग नोंदवत उपक्रमाचे यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.