पाचोड (विजय चिडे) – मनुष्याला इच्छा पूर्ण करायच्या असतील तर काळाबरोबर चालणे त्याचबरोबर आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येका जवळ आर्थिक साक्षरतेचे ज्ञान असणे गरजेचे असल्याने पाचोड येथील शिवछत्रपती महाविद्यालय मध्ये महाराष्ट्र उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, करिअर कट्टा आणि सेबी मार्फत ‘आर्थिक साक्षरता’ यामध्ये ‘इंट्रोडक्शन टू इंडियन सेक्युरिटी मार्केट’ या विषयावर (दि.१९) रोजी मंगळवारी कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी सेबीच्या ट्रेनर सारिका लोहना यांनी आर्थिक साक्षर हाेणे गरजेचे आहे, असे सांगितले.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मयूर पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे तसेच करिअर कट्ट्याचे समन्वयक डॉ. गांधी बानायत यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम सर्व पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुढे बोलताना सारिका लोहना यांनी आर्थिक नियोजन कसे करावे, ज्यांच्याकडे आर्थिक नियोजन नसेल त्यावेळेस नातेवाईक, मित्र व बँका हे सुद्धा संबंधिताला मदत करू शकत नाही. त्यासाठी आर्थिक बचत आणि गुंतवणूक हे विचार करून करावे. हे महत्त्वाचे तत्व त्यांनी सांगितले. विविध आर्थिक योजना बचत, व्याज आणि परतावा. त्याचबरोबर बोगस कंपन्यांपासून सावधान याविषयी सविस्तर मार्गदर्शन या कार्यशाळेत त्यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभागाचे प्रा हेमंतकुमार जैन यांनी करून दिला तसेच या कार्यशाळेची भूमिका डॉ. शिवाजी यादव यांनी स्पष्ट केली. पाचोड व परिसरातील या कार्यशाळेला आलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी आदींचे स्वागत डॉ. सुरेश नलावडे, डॉ. ह.सो. बिडवे, डॉ. विलास महाजन, प्रा. विनोद कांबळे यांनी गुलाब पुष्प देऊन केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. चंद्रसिंग कोठावळे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुकाराम गावंडे यांनी केले, तर आभार प्रा. संदीप सातोनकर यांनी मानले. या आर्थिक साक्षरता कार्यशाळेस पाचोड आणि पाचोड परिसरातील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष चव्हाण, डॉ. भगवान जायभाये, डॉ. उत्तम जाधव डॉ. सुभाष पोटभरे , प्रा. सचिन कदम,प्रा. नितीन चित्ते,अनिल नरवडे, सतीश वाघ, गजानन इंगळे, मुरलीधर झिने, बालाजी थोरे, उमाकांत भोसले, गजानन गवारे आदींनी परिश्रम घेतले आणि कार्यशाळा यशस्वी झाली.