आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लशीकरण मोहिमेत आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे माध्यमातून १४ केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय येथे ६ हजार ८५ बालकांना पोलिओ डोस देण्यात आल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालय आळंदीमध्ये पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ वावरे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते करण्यात आले. आळंदी शहरात १८ पोलिओ बूथ तसेच १ मोबाईल टीम आणि १ नाईट टीम तैनात करण्यात आली होती.
माऊली मंदिरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमेस उत्साही प्रतिसाद मिळाला. माऊली मंदिरात मंदिराचे व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी शहर शिवसेनेचे प्रमुख राहुल चव्हाण, संजय घुंडरे, किरण येळवंडे यांचे हस्ते डोस देण्यात आले. गजानन महाराज मंदिर केंद्रात पल्स पोलिओ मोहीमेचे उद्धाटन माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांचे हस्ते झाले. सारडा धर्मशाळा आळंदी येथे पल्स पोलिओ मोहीमेचे उद्घाटन चारुदत्त प्रसादे, विठ्ठल शिंदे यांचे हस्ते झाले. ग्रामीण रुग्णालयात पल्स पोलिस लसीकरण करताना हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका अध्यक्ष अर्जुन मेदनकर, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील, अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे, डॉ. शुभांगी नरवडे आदी चे हस्ते लस देण्यात आली. यावेळी ज्ञानेश्र्वर कुऱ्हाडे गोविंद ठाकूर, बाळासाहेब पेटकर यांचेसह बालकांचे माता पिता उपस्थित होते. उत्साहात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू झाली. आळंदी ग्रामीण रुग्णालय येथे तसेच शहरातून लसीकरण उत्साही प्रतिसाद मिळाल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. राहिलेल्या बालकांना सोमवारपासून (आयपीपीआय अंतर्गत) घरोघरी जाऊन रुग्णालयाच्या टीम लस देणार आहेत. रविशेठ वावरे यांनी पोलिओत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची भोजन व्यवस्था केली. ६ हजार ८५ बालकांना पोलिओची लस देण्यात आली.