बुलडाणा (राजेंद्र काळे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर स्वप्नील मिश्रा या युवकाने मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर येत धर्मवीर आमदार संजुभाऊंचे पाद्यपूजन केले. २ वर्षांपूर्वी संजुभाऊंच्या माध्यमातून त्याला जे जिवनदान मिळाले, त्याप्रती स्वप्निलने या माध्यमातून बुधवार १३ जुलै रोजी कृतज्ञता व्यक्त केली.
स्वप्नील निर्मल मिश्रा याचा दोन वर्षाअगोदर भयंकर अपघात झाला होता, त्यामध्ये त्याच्या मेंदूला जबरदस्त मार लागल्यामुळे खूप रक्तस्त्राव होत होता. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या घरून धर्मवीर आ.संजय गायकवाड यांना फोन आला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब आपली धर्मवीर अॅम्ब्युलन्स पाठवून त्याला प्राथमिक उपचारासाठी बुलडाणा येथील रुग्णालयात पाठवले, तिथे त्याला अकोला रेफर करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर संजुभाऊनी वेळ वाया न घालवता अॅम्ब्युलन्स अकोला रुग्णालयात पाठवली. तिथे त्याला ७ ते ८ रक्ताच्या बॅग लागणार होत्या. त्यासुद्धा भाऊंनी ताबडतोब व्यवस्था करून दिल्या. त्यानंतर त्याच्या वडिलांचा भाऊंना फोन आला की, आता त्याला नागपूर येथील हॉस्पिटलला हलवावे लागणार. भाऊंनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना पैसे पाठविले आणि त्याला अकोला येथून नागपूरकडे जाण्याची व्यवस्था केली. तिथे जाण्याअगोदर सुद्धा तेथील हॉस्पिटलमध्ये संजुभाऊनी पूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. नागपूरला २-३ दिवस ठेवल्यानंतर डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रेफर करावे लागेल असे सांगितले. हे भाऊंना माहित पडल्यानंतर आ.गायकवाड यांनी नागपूरला आपली अॅम्ब्युलन्स पाठवून मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये सुद्धा पूर्ण व्यवस्था करून ठेवली. त्याला काहीही कमी पडु दिले नाही, त्यानंतर ८ ते १० दिवस तिथे उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला. त्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर बुलडाणा येथे आपल्या घरी आल्यावर त्याला महिनाभर बेडरेस्ट होता. आपल्यासोबत काय घडलं, याची त्याला मुळीच कल्पना सुद्धा नव्हती, तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याचे वडील निर्मल मिश्रा यांनी त्याला पूर्ण इतिवृत्त सांगितले की कसे आ. गायकवाड हे त्याचा अपघात झाल्यापासुन एका सावलीप्रमाणे त्याच्या सोबत होते, कशी प्रत्येक क्षणी त्यांनी मदत केली याचा पूर्ण पडताळा त्यांनी केल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आले. या कलियुगामध्ये भाऊ भावाच्या कामी येत नाही परंतु संजुभाऊ देवासारखे त्याच्यासाठी धावून आले आणि त्याला मृत्यूच्या दारातून परत आणले. त्यानंतर त्याचे पूर्ण कुटुंब आ.गायकवाड यांना भेटण्यासाठी आले होते व भाऊचे कधीही न फिटणाऱ्या उपकारासाठी आभार मानत होते. तेव्हापासुन स्वप्नील दर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आ.संजय गायकवाड यांच्या दर्शनासाठी येतो व आपला जीव वाचवीला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.