पिंपरी-चिंचवड (ब्रेकिंग महाराष्ट्र) – चिंचवड येथील तानाजी नगर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुकडून शिकलेली संगीत विद्या शिष्यांनी गुरुसह परिसरातील नागरिकांसमोर सादर केली. या संगीत मैफिलीने नागरिक मंत्रमुग्ध झाले होते. स्वरतरंग संगीत शाखेच्यावतीने हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गुरू पौर्णिमेनिमित्त स्वरतरंग संगीत शाखेच्यावतीने तानाजी नगर चिंचवड येथे शिष्यांकडून गुरुंसाठी व परिसरातील नागरिकांसाठी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील मुला-मुलींना संगीताची आवड राहावी व पुढे चिंचवड परिसरातून मोठे कलाकार घडावे या हेतूने या शाखेचे प्रमुख विश्वनाथ रामचंद्र सतत प्रयत्न करीत असतात. या कलाकारांना आपली कला सादर करता यावी व नागरिकांना याचा आनंद मिळावा व गुरुपौर्णिमा साजरी व्हावी अश्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. अशोक कुमार सोनानी हे होते.
या कार्यक्रमात परिसरातील मुला-मुलींनी तबला वादन, बासरी, हार्मोनियम, व विविध भजन आदी कला सादर केल्या. या मंत्र मुग्ध कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला. परिसरातील मुला-मुलींना संगीताची आवड लागण्यासाठी व यातून मोठे कलाकार होण्यासाठी जेव्हा जेव्हा मदत लागेल माझ्याकडून श्यक्य ते प्रयत्न केले जातील, असे आश्वासन महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी उपस्थित कलाकार व नागरिकांना दिले. शाखेचे प्रमुख विश्वनाथ रामचंद्र यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्ताविक केले. सुकेश देशपांडे, मिलिंद कुलकर्णी, स्वरूप पेंढुरकर, अतुल जोशी, आदित्य सुतार, आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.
Leave a Reply