बुलढाणा/चिखली(संजय निकाळजे)- शासनाने अतिक्रमणधारकांना कायम पट्टे व आठ द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने चिखली तहसील कार्यालयावर शुक्रवार, 15 डिसेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिखली तालुका आणि शहरातील अतिक्रमणधारक शासकीय जागेवर अनेक वर्षापासून घरे बांधून राहत आहेत. या गोरगरिबांना घरकुल योजना, बँकेचे कर्ज व इतर अनेक सवलतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. गोरगरिबांना हक्काची जागा मिळावी व त्यांना शासनाने कायम पट्टे देऊन आठ अ देण्यात यावी, यासह इतरही अनेक अतिक्रमण धारकांच्या मागण्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडीच्यावतीने या मोर्चाचे आयोजन केले आहे .सदर मोर्चा शिवाजी महाराज पुतळापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, बैल जोडी चौक या मार्गे तहसील कार्यालयावर धडकणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर ,युवा नेते सुजात आंबेडकर , जिल्हा प्रभारी धैर्यवर्धन फुंडकर, भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष सविता मुंडे, युवा महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश उपाध्यक्ष शरद वसत्कार, युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, यांचे मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघणार असून, यावेळी मोर्चाला जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, महासचिव प्रशांत वाघोदे, विष्णू उबाळे, युवा अध्यक्ष सतीश पवार, अशोक सुरडकर, बाळा राऊत ,एड इंगळे, रमेश आंबेकर, शेषराव मोरे, अलका जायभाय, मालती ताई निकाळजे, अंबादास जाधव ,अर्जुन बोर्डे, दगडू जाधव, बी एल खरात, गजानन धुरंधर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मोर्चामध्ये भारिप बहुजन महासंघ कार्यकर्ते, अतिक्रमणधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष गजानन धुरंदर शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे यांनी केले आहे.