आळंदी ( अर्जुन मेदनकर ) ज्ञानराज माऊली नाम गजर , पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, मृदंग, वीणेसह टाळांचा नाद,… आणि नामदास महाराज यांचे हृदयस्पर्शी कीर्तन सेवेत संत महिमा…हरिनाम जयघोष करीत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधीवर तुळशी फुलांसह विविध रंगी फुलांच्या पाकळ्यांची भाविकांनी केलेली पुष्पवृष्टी झाली. आळंदी मंदिरात घंटानाद होताच हृदयस्पर्शी वातावरणात माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी ( दि. ११ ) साजरा झाला. मंगळवारी ( दि. १२ ) श्रींचा वैभवी छबिना पालखी मिरवणुकीने हरिनाम गजरात सोहळ्याची सांगता होणार असल्याचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले.
यावेळी प्रभारी जिल्हा प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश तथा देवस्थानचे अध्यक्ष के.पी. नांदेडकर, या सोहळ्यास संत नामदेवरायांचे वंशज नामदास महाराज परिवार, आळंदी संस्थानचे सरपंच प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, पंढरपूर देवस्थान समिती सदस्या अॅड. माधवी निगडे, चोपदार बाळासाहेब रणदिवे, रामभाऊ रंधवे चोपदार, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, मानकरी योगेश आरू, साहिल कुऱ्हाडे, स्वप्नील कुऱ्हाडे, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नंदू वणवे, डॉ. शुभांगी नरवाडे, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, श्रीधर सरनाईक, माजी नगरसेवक सागर भोसले, सचिन गिलबिले, मंडलाधिकारी स्मिता जाधव, एसीपी वसंत परदेशी, पोलीस अधिकारी राजेंद्र गौर, विवेक मुगळीकर, संदीप डोईफोडे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस नाईक मच्छिन्द्र नाईक, पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, उपव्यवस्थापक संजय रणदिवे, श्रीधर सरनाईक, मानकरी योगिराज कुऱ्हाडे, स्वप्नील कुऱ्हाडे, आळंदी नगरपरिषदेचे आजी, माजी नगरसेवक पदाधिकारी, कीर्तनकार, प्रवचनकार, फडकरी, दिंडीकरी, मानकरी उपस्थित होते.
मंदिरातील विना मंडपात परंपरेने संत नामदेवराय यांचे वंशज माधव नामदास महाराज यांची माऊलीचे जीवन चरित्रावर आधारित हृदयस्पर्शी कीर्तन सेवा झाली. दरम्यान विना मंडपा समोर महाद्वारात श्री गुरु हैबतरावबाबा आरफळकर याचे वतीने पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांचे नातू ऋषिकेश महाराज आरफळकर ( आळंदीकर ) यांची कीर्तन सेवा झाली. तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात श्रींचे संजीवन समाधी प्रसंगावर आधारित विविध ठिकाणी कीर्तन सेवा सुश्राव्य वाणीतून राज्यातील नामवंत कीर्तनकार महाराजांनी रुजू केली. तसेच आळंदी परिसरात ठिक ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन कार्यावर आधारित कीर्तन सेवा तसेच समाधी प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा सुश्राव्य वाणीतून नामवंत महाराजांनी सादर केली.
संत नामदेव महाराज यांचे अभंगावर आधारित वंशज माधव महाराज नामदास यांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या हृदयस्पर्शी वाणीतून कीर्तन सेवा केली. माऊलींचे संजीवन समाधी सोहळ्यात कीर्तन करीत असताना महाराजांचे डोळ्यांतून अनेक वेळा आश्रुंचा बांध फुटला. यावेळी अनेक भाविकांच्या नेत्रांचे कडा देखील पान्हवल्या. माऊलींचे समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तनात भक्त भारावले. यावेळी नामदास महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र अनेक संतांच्या संत वचनाचे दाखले प्रमाण देत सांगत कीर्तन सेवा रुजू केली. आळंदीत श्रीचे संजीवन समाधी प्रसंगाचे वर्णन आणि जीवन चरित्र श्रवण करताना अनेक नागरिक,वारकरी, भाविकांच्या डोळ्याच्या कडाही पान्हावल्या आणि श्रीचे संजीवन समाधी प्रसंगाच्या कल्पनेने उपस्थित भाविकही गहिवरुण गेले. माधव महाराज नामदास यांचे हृदयस्पर्शी कीर्तन सेवेत भक्ती चैतन्यमयी वातावरणात श्रीचे संजीवन समाधी सोहळा प्रसंगावर कीर्तन झाले. माउलीचे मंदिरात श्रीचे संजीवन समाधी दिनास विविध धार्मिक कार्यक्रमांनी भल्या पहाटेच सुरुवात झाली. पहाटे पवमान अभिषेक, दुधारती आळंदी देवस्थानचे सरपंच प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते प्रथा परंपरेप्रमाणे झाली. या प्रसंगी नामदास महाराज परिवार उपस्थित होते.
संत नामदेवराय यांचे वतीने नामदास परिवारातर्फे महापूजा परंपरेने करण्यात आली. तसेच मंदिरात भाविकांच्या देखील चल पादुकांवर महापूजा झाल्या. दर्शन कमी वेळेत जास्त भाविक कसे घेतील यासाठी प्रभावी नियोजन करण्यात आले होते. कीर्तन सेवा रुजू करून हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिरात हरीनाम गजरात प्रदक्षिणेस प्रवेश झाला. श्रींचे गाभा-यात संत नामदेवराय पादुकासह श्रीची पूजा, आरती, श्रींचे संजीवन समाधी समीप नामदेवरायांचे वैभवी पादुकांची पूजा झाली. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, माउली ज्ञानोबा, माउली, ज्ञानोबा-तुकाराम असा नामजयघोष होताच घंटानाद करण्यात आला. फुलांची मुक्त उधळण, तुळशी पत्रे मंजी-याचा श्रीचे संजीवन समाधीवर पुष्पवृष्टीत भाविकांनी वर्षाव केला. कीर्तनसेवा संपताच श्रीची आरती झाली, दरम्यान गाभा-यात आरती, घंटानादानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी च्या वतीने प्रमुख मानकरी, पदाधिकारी, सेवक यांना नारळ प्रसाद देण्यात आला. श्रीना महानैवेध्यानंतर सोपानकाका देहूकर यांचे वतीने कीर्तन सेवा उत्साहात झाली . हैबतरावबाबा यांचे तर्फे हरीजागर सेवा झाली. आळंदी पंचक्रोशीत सोहळ्या निमित्त कीर्तन सेवा, महाप्रसाद वाटप हरिनाम गजरात झाला. दरम्यान भोजलिंग काका मंडपात दाणेवाले निकम दिंडी तर्फे किर्तन सेवा झाली.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा लावून पंचामृत अभिषेक पूजा अकरा ब्रम्ह्वृंदांच्या वेद मंत्र जयघोषात पूजा बांधली . श्रींचे संजीवन समाधी दिनी पहाट पूजेचे वेदमंत्र जयघोषात पठन पौरोहित्य यशोदीप जोशी, प्रसाद जोशी, योगेश चौधरी, नाना चौधरी यांचेसह आळंदीतील ब्रम्हवृंदांचे वेदमंत्र जयघोषात झाली. श्रींचे संजीवन समाधी सोहळ्यात पहाट पूजेत पौरोहित्य प्रसाद जोशी, निखिल प्रसादे, यशोदीप जोशी, आनंद जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, मंदार जोशी, श्रीरंग तुर्की, संदीप कुलकर्णी, अवदूत गांधी, विजय कुलकर्णी यांनी वेद मंत्र जय घोष करीत रूद्राभिषेक व पवमान अभिषेक प्रथा परंपरेचे पालन करीत केला.
मंदिरात आकर्षण विविध रंगी फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधले. माऊलीना लक्षवेधी पोशाख व मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली. विद्युत रोषणाई सेवा मोठ्या प्रमाणात झाल्याने मंदिराचे अंतरंग व बाह्यरंग लक्षवेधी रोषणाईने उजळून निघाले. यावर्षीची पुष्पसजावट व विद्युत रोषणाई सेवा लक्षवेधी ठरली. रंगावलीने यात आणखी भर घातली. स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्षा आशा तापकीर यांचे मार्गदर्शनात मंदिरात विशेष स्वच्छता सेवा देण्यात आली. यासाठी सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
आळंदीत कार्तिकी यात्रा चोख व्यवस्थेने समाधानी असल्याचे आळंदीचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. यावर्षी आळंदी कार्तिकी यात्रेत सुसंवादास प्राधान्य दिल्याने यात्रेचे नियोजन ठरल्या प्रमाणे प्रशासनाने कामकाज केले. यातून भाविकांसह नागरिकांना सुविधा देता आल्या. यात्रा काळात नागरी सुविधां बाबत भाविकांची तसेच नागरिकांची सोय केली. यावर्षी भाविकांच्या आरोग्याची तसेच सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली. यात्रेसाठी आळंदी देवस्थान तसेच जिल्हा महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाने देखील सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. आळंदी कार्तिकी यात्रा काळात पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख, प्रांत जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. विकास ढगे, व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रमेश पाटील, सतीश नांदुरकर, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे आदींनी केलेल्या नियोजना प्रमाणे कामकाजात परिश्रम घेतले. यामुळे आळंदीतील यात्रेचे नियोजन व्यवस्थित पार पडले.