Breaking newsHead linesMaharashtraVidharbha

रविकांत तुपकरांच्या घराला पोलिसांचा वेढा; कुठल्याहीक्षणी अटकेची शक्यता!

– पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकरी आंदोलन मोडित काढण्याचा सरकारचा प्रयत्न?

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सोयाबीन, कापसाला भाव देण्यात यावा, राज्यात दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई द्यावी, यासह इतर शेतकरी हितांच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभे करणारे, आणि एल्गार महामोर्चा व रथयात्रेच्या माध्यमातून जिल्हा दणाणून सोडणारे शेतकर्‍यांचे पंचप्राण, लढवय्ये नेते रविकांत तुपकर यांना कोणत्याहीक्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुपकरांनी २९ तारखेला शेतकर्‍यांसह मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे हादरून गेल्याचे जाणवत असून, तुपकरांना प्रचंड घाबरले असावे. त्यामुळेच पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुपकरांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची खात्रीशीर सूत्रांकडून माहिती हाती आली आहे. त्यामुळे तुपकरांवर पाळत ठेवली जात असून, तुपकरांच्या घराला पोलिसांनी वेढा घातला आहे.

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट मंत्रालयाचा ताबा घेण्याचा गंभीर इशारा दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे प्रचंड घाबरलेले असावे.  त्यामुळे कालच सरकारने बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्यामार्फत  तुपकरांना नोटीस बजावत, आंदोलन करू नये अन्यथा कारवाई केली जाईल, असा नोटिसीद्वारे इशारा दिलेला आहे. त्यानंतर आज पहाटेपासून तुपकरांच्या घराला पोलिसांनी वेढा घातला असून, तुपकरांवर पाळत ठेवली जात असल्याचे दिसून आलेले आहे.

फडणवीसांना बदनाम करण्याची सुपारी बुलढाणा पोलिसांनी घेतली आहे का?


दरम्यान, राज्यातील सरकारने पोलिसांकरवी किती दडपशाही केली तरी शेतकर्‍यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपण आंदोलन करणारच आहोत. कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. २९ नोव्हेंबररोजी मंत्रालयावर धडक देणारच असे रविकांत तुपकरांनी ठामपणे सांगितले आहे. सरकारने शेतकरी आंदोलन मोडित काढण्यापेक्षा तातडीने मागण्या मान्य कराव्यात व शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकर्‍यांच्या संयमाचा उद्रेक होईल, आणि तो या सरकारला परवडणार नाही, असेही तुपकरांनी ठणकावून सांगितले आहे.
————–

पोलिसांनी तुपकरांना केली अटक, न्यायालयाने केली सुटका; जिल्हाभर शेतकरी उद्रेक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!