Head linesMEHAKARVidharbha

कुणबी नोंदी तपासण्याचे काम जिल्ह्यात युध्दपातळीवर!

– मेहकर तालुक्यात आढळल्या १८ हजार कुणबी नोंदी

बुलढाणा (बाळू वानखेडे) – मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मोठे आंदोलन उभे केल्यानंतर शासन खड़बड़ून जागे झाले असून, युध्दपातळीवर कुणबी नोंदी शोधण्याच्या कामात गुंतले आहे. जिल्ह्यातही सहा महसूल उपविभागांतर्गत तेराही तालुक्यात कुणबी नोंदी तपासण्याचे काम सुरू असून, मेहकर तालुक्यात अशा १८ हजार ६६७ कुणबी नोंदी सापड़ल्या आहेत. गेल्या २१ वर्षात मेहकर उपविभागातील मेहकर व लोणार तालुक्यात ३६ हजार कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहेत.

मराठा जातीला सरसकट कुणबी जातीचे आरक्षण लागू करावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी, जि. जालना येथे मोठे आंदोलन केल्यानंतर शासन खड़बड़ून जागे झाले. मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती गठीत केली. सदर समितीने राज्यातील नोंदी तपासण्याचे आदेश दिल्यानंतर सगळीकड़े सदर नोंदी तपासणीचे काम युध्दपातळीवर सुरू असून, जिल्ह्यात जिल्हाधिकारी ड़ॉ. किरण पाटील यांनी सहा उपविभागीय अधिकारी व तेरा तहसीलदार यांना सदर काम तातड़ीने करण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वच तहसील कार्यालयात सदर काम जोमाने सुरू आहे. काही ठिकाणचे काम पूर्ण देखील झाले आहे. यामध्ये मेहकर तालुक्यात १८ हजार ६६७ कुणबी नोंदी आढळल्याचे मेहकरचे तहसीलदार नीलेश मड़के यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. यामध्ये भोसा १०९, मोळा ४०६, मोळी १०६, शहापूर १८९, लोणी गवळी ८१, घाटबोरी ९९, डोणगाव २६३, गोहोगाव १५८, आरेगाव २९१, जवळा ५३, मादणी ३७७, दे.साकरशा ३४, मोहना बु. ८, मांड़वा फॉ.१५ , मांड़वासमेत ड़ोंगर ७, उटी १८, गोमेधर १८, वड़ाळी १४, शिवपुरी ४३३, चायगाव ४३८, कळपविहीर २९५, बदनापूर ४९, चोंढी ३५, नांद्रा न.चायगाव १८, मोहोदरी २००, वर्दळी वैराळ ३२१, सुभानपूर १०१, शेलगाव काकड़े १२७, हिवरा बु. ३६१ गजरखेड़ ५१८, लव्हाळा ५०४, २०१, दुधा ३६१, ब्रम्हपुरी ६७५, रायपूर ३५७, पोखरी ९०, पिंपळगाव उंड़ा ३२३, पेनटाकळी ४४४, माळखेड़ २९२, वरदड़ा ८९७, मोहखेड़ ३९५, मेहकर भाग दोन १७४, नागझरी ३२५, उसरण २९५, कोयाळी २५७, सारंगपूर ९२, जयताळा २१५, बरटाळा १५१ लोणीकाळे ९०, बोथा १७, निंबा ४०, कळंबेश्वर २६९, मुंदेफळ २६, हिवरा खु .८४६, सुळा २६, पारड़ी ३४, घुटी ४७, देळप २९, मारोतीपेठ ३११, हिवरासाबळे १४५, अकोला ठाकरे २२४, रत्नापूर ८८, पळशी ५, अंजनी बु. २७६, नागापूर ५७, सोनाटी १८१, बोरी १७४४, सुकळी १२०, उकळी २८३, परतापूर ५१, चिंचोली बोरे ५६, पारड़ा ५६०, गणपूर २१७, अंत्री देशमुख १४३, व जानेफळ, मोसंबवाड़ी, मिस्कीनवाड़ी १५४२ आदी नोंदी सापड़ल्या आहेत. यामध्ये फेरफार, कोटवार बुक, हक्क नोंदणी, सातबारा, पेरेपत्रक यासह इतर अभिलेखे तपासण्यात आले आहेत.


मेहकर उपविभागीय कार्यालयाकड़ून १९९६ ते २०१७ दरम्यान ३६ हजार ९०८ कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आली आहेत. यामध्ये मेहकर तालुक्यात २१ हजार ५८१ तर लोणार तालुक्यात १५ हजार ३२७ कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आली आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दिनेश गिते यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!