MEHAKARVidharbha

मेहकर तालुक्यात ‘एल्गार रथयात्रे’चे अभूतपूर्व स्वागत!

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – मेहकर तालुक्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या एल्गार रथयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला असून, ठीकठिकाणी अभूतपूर्व स्वागत करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना पीक नुकसानीपोटी एकरी दहा हजार रूपयांची नुकसान भरपाई, सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करणे, यासह इतर मागण्यांवरून तुपकर यांनी या दौर्‍यात राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे.

मेहकर तालुक्यात काल तिसर्‍या दिवशी ‘एल्गार यात्रा’ दाखल होताच तालुक्यातील नायगाव देशमुख, देऊळगाव साकरशा, वरवंड, जानेफळ, घुटी, पार्डी, हिवरा खुर्द, मारोती पेठ, मोळा-मोळी, लोणी गवळी, विश्वी या गावांत प्रचंड मोठ्या उत्साहात फुलांची उधळण करत गावकर्‍यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, लोणी गवळी, विश्वी या ठिकाणी मोठ्या सभा पार पडल्या. सर्व गावांमध्ये रविकांत तुपकर यांनी गावकर्‍यांशी उत्स्फूर्त संवाद साधला.
तालुक्यात ‘एल्गार रथयात्रे’ला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असा ठरला. शेतकरी-शेतमजूर बांधवांच्या मनात आपल्या हक्कासाठी निर्माण झालेली आग निश्चित सरकारला हलविणारी असेल, असा विश्वास रविकांत तुपकरांनी व्यक्त केला. या दौर्‍यामध्ये काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक नेते यामध्ये लक्ष्मणदादा घुमरे, देवानंद पवार, भास्करराव ठाकरे, सागर पाटील, पांडुरंग पाटील, प्रा.भैय्यासाहेब पाटील, जितूभाऊ अडेलकर, गोपाल सुरडकर, दिलीप बोरे, भूषण काळे, अनिल बोरकर, वैभव आखाडे, देवेंद्र आखाडे, कैलास उत्तपुरे, शिवाजी ढवळे, महेश काळे, गजानन देशमुख, पांडुरंग पाटील, कृष्णा चव्हाण, बी. एम, राठोड, सखाराम आमले, विजय आंधळे, रामेश्वर वायाळ, गजानन होनमणे, अक्षय निकस, गणेश तिवारी, ज्ञानेश्वर दांदडे, बाळूभाऊ देवकर, गणेश कष्टे, आकाश मोसंबे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘एल्गार रथयात्रे’च्या तिसर्‍या दिवशीच्या यशस्वी नियोजनासाठी डॉ. ज्ञानेश्वर टाले व सहकार्‍यांनी प्रचंड मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!