संतवीर वारकरी भूषण बंडातात्या कराडकर यांचे मार्गदर्शन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांनी त्यांचे वडील स्व. दशरथ कोंडीबा बालवडकर यांचे स्मरणार्थ प्रथम पुण्यस्मरण दिनी २०० बेडच्या भव्य हॉस्पिटलसाठी जागा दान ( भुदान ) दिली. आळंदीत गोरगरिबांसह वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा व्हावी, यासाठी आळंदीत सुसज्ज हॉस्पिटला जागा दान देऊन वारकऱ्यांसाठी दोनशे बेड चे भव्य हॉस्पिटल निर्माण करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.
स्व. दशरथ कोंडीबा बालवडकर यांचे प्रथम पुण्यस्मरण दीना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून वारकरी संप्रदायातील मान्यवर महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, साधक विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्त रामकृष्णदास महाराज लहवितकर यांची हृदयस्पर्शी वाणीतून कीर्तनसेवा रुजू झाली. कार्यक्रमास संतवीर वारकरी भूषण बंडातात्या कराडकर, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ, माधवीताई निगडे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव नरहरी महाराज चौधरी, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, आनंद देशमुख, मधुकरआबा पाडळे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, श्रींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, राजेश्वर पांपटवार, सचिन महाराज शिंदे, माऊली घुंडरे, ज्ञानेश्वर गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, हिंजवडी आळंदी या भागातील बहुसंख्य वारकरी तसेच साधक यांची उपस्थिती लक्षणीय होती.