LONARVidharbha

बिबी येथील संत गजानन महाराज मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन

– परिसरातील भाविक-भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – येथील श्री संत गजानन महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी ग्रामस्थांच्या विनंतीवरून खासदार प्रतापराव जाधव यांनी तब्बल १० लाख रूपयांचा निधी दिला आहे. या मंदिराच्या सभामंडपाचे आज (दि.६) सकाळी ११ वाजता योगेशभाऊ जाधव यांच्याहस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी बिबीसह पंचक्रोशीतील गावांची भाविक-भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन तीर्थक्षेत्र प्राप्त असलेले बिबी येथील श्री गजानन महाराज संस्थान या ठिकाणी भव्य सभामंडपाचे काम आता मार्गी लागत आहे. त्याबद्दल भाविक-भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. आजच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी योगेशभाऊ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, गावाचे प्रथम नागरिक सरपंच मातोश्री गुलमोहरताई, उपसरपंच भास्कर खुळे व संस्थापक अध्यक्ष सारंगधर महाराज टेके, विश्वस्त मंडळी, बिबी ग्रामपंचायतमधील सदस्य संदीपभाऊ बनकर व डॉ. बोडके साहेब, नीलेशभाऊंच्या मातोश्री सुनीताबाई भांड, कैलासभाऊ मोरे, बबलूभाऊ आटोळे, उमेश राठोड, माऊली कुहीटे, रमेश कुरंगळ, गजानन मेहेर, गोविंद टेके, केशव डहाळके, गोपी काळे, गणेश तनपुरे, शिवाभाऊ काळे, दराडे भाऊ मांडवा, राम भालेराव, बनकर पाटील, गजानन आंधळे, दत्तात्रय महाराज, गरकळ, गोपाल महाराज टेके व सेवाधारी गट बिबी, चोरपांग्रा, चिखला, मांडवा व परिसरातील भाविक भक्त, माता-भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!