Vidharbha

आषाढी एकादशी व बकरी ईदच्या उत्साहातून घडले एकतेचे दर्शन

मेरा बु , ता. चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) :  स्थानिक गावामध्ये मुस्लिम समाज बांधवांनी आणि मराठा समाज बांधवांनी आषाढी एकादशी व बकरी ईदच्या उत्साहातून गावकऱ्यांना एकतेचे दर्शन घडविले .
आषाढी एकादशी निमित्त मेरा बु येथील भाविक भक्तांनी श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी रांगा लावून श्री च्या समाधीचे दर्शन घेतले तर विविध देवदेवतांच्या मंदिरात विवीध धार्मिक कार्यक्रम घेवून एकादशी साजरी केली त्यामध्ये मनुबाई येथील २० ते २५ महिलांनी गुंजाळा गावी येवून श्रीच्या मंदिरात सकाळी आरती , हरिपाठ ,पोथी वाचन करुण प्रत्येक महिलांनी श्रीच्या जीवनावर गाणे गायले. त्यामुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. त्याच बरोबर बकरी ईद उत्साह साजरा करण्यासाठी गावातील सर्व मुस्लिम बांधव एकत्र येतात, तसेच या सणासाठी बाहेर शहरात राहणारे एकमेकांचे नातेवाईक मुले मुली गावी येतात. सर्वांच्याच घरी उत्साह निर्माण होतो. सकाळी सर्व मुस्लिम बांधव मस्जिद मध्ये जमा होवून नमाज अदा केली .  त्यामध्ये काही अत्यंत गरीब अथवा आजारी व्यक्तीला मदत करुण बकरी ईद साजरी केली . एकीकडे आषाढी एकादशी निमित्त आलेल्या भाविक-वारकरी यांची व्यवस्था मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आली होती. आलेल्या भाविक भक्तांना तसेच गावकऱ्यांना उपाशी , चिवडा , फराळ नास्ता वाटप करण्यात आला . तर दुसरीकडे मुस्लिम वस्तीत गोरगरिबांना कपडे , विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल वाटप केले . यावेळी जि.प. च्या महिला व बाल कल्याण सभापती सौ ज्योतीताई पडघान ,  माजी सभापती विनायकराव पडघान ,  कृषी माजी सभापती अशोकराव पडघान ,  प.स.सदस्य सत्तार पटेल, अतिक सौदागर ,  पत्रकार प्रताप मोरे, सेवानिवृत्त कर्मचारी शंकर केदार , एकनाथ केदार , दशरत केदार , सिध्दांर्थ गवई ,  विजायानंद मोरे , बबन मोरे , नारायण मोरे ,  मुजु पटेल,  याकूब पटेल , सांडू शहा , मकसूद शहा ,  राष्ट्रवादी ता अध्यक्ष गजानन वायाळ, सरपंच वायाळ, उपसरपंच दिनकरराव डोगरदिवे ,  माजी सरपंच सौ अर्चना सुनील पडघान , विजू पाटील , निखिल पडघान , तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पडघान ,  पो पा बद्रीप्रसाद पडघान ,  आदी जण उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!