Vidharbha

शेतीच्या वादावरून विवाहितेला मारहाण

मेरा बु , ता. चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) : विवाहिता व विवाहितेचा पती शेतात सोयाबीन पीक लावत असतांना जबरदस्तीने आरोपीने शेतात ट्रॅकटर आणून वखरने सुरू केले म्हणून त्यांना हटकले असता, त्यांनी काढीने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. मारहाणी मध्ये हातातील बांगड्या फुटल्याने हाताचे रक्त निघाले, अशा महिलेच्या तक्रारी वरुन पोलिसांनी बाप लेका विरुद्ध गुन्हा दाखल केला, ही घटना देऊळगा घुबे येथे घडली .

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दे घुबे येथील रहिवाशी असलेल्या सौ नंदा ज्ञानेश्वर घुबे यांनी तक्रारी मध्ये नमूद केले की, दे घुबे शिवारात स्वतःच्या मालकीची मुलाच्या नावाने गट ५३ मध्ये २ एकर ६ गुंठे जमीन आहे .  मुलावर कर्ज असल्याने मुलाने गावस्तील संजय श्रीराम सावळे यांच्याकडून व्याजाने पैसे जमीन खरेदी करून दिली .  व्याजाने पैसे घेतल्याने जमीन आमच्या ताब्यात होती, त्यामुळे मी व माझे पती ज्ञानेश्वर घुबे आम्ही शेतात सोयाबीन लावत असतांना वाद करण्याचा उद्देशाने संजय सावळे व त्याचा मुलगा पवन सावळे हे ट्रॅकटर घेवून आमच्या शेतात आले. आम्हाला काहीही न विचारता शेत वखरू लागले, म्हणून त्यांना हटकले की तुम्ही शेत वखरू नका. शेतात बाहेर जा, असे म्हणताच बाप लोकांनी मला काढीने व लाथाबूक्याने हातावर , मांडीवर , कमरेवर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली .  अशा महिलेच्या तक्रारी वरुण ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार यांनी आरोपी संजय श्रीराम सावळे , पवन संजय सावळे यांच्या विरुद्ध कलम ३२४ , ५०४ , ५०६ ,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!