– इंद्रायणी नदीकाठी बजावली सेवा
पंढरपूर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – धुळे एसडीआरएफ टीमचे राज्यभरात कौतुक होत असून, सर्वत्र जवानांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चंद्रभागेच्या तीरी १२ भाविकांना धुळे एसडीआरएफ टीमने वाचवले असून, अजूनही टीम त्याठिकाणी कर्तव्य बजावत आहे.
राज्यात ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येते त्याठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एसडीआरएफ टीम आपले कर्तव्य बजावण्यात माहिर आहे. यावेळी वेळेवर मान्सून दाखल झाला असून ठिकठिकाणी पावसाने मोठ्या जोशात हजेरी लावली आहे. त्यातच आषाढी एकादशी असल्याने पंढरपूर येथे देशभरातील भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहात असता, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन दरवर्षी नियोजनबद्ध बंदोबस्त लावत असताना, धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम देखील या सुरक्षा व्यवस्थेत आपल्या योगदानासाठी प्रशंसनीय कार्य करत असते. यावेळी देखील धुळे एसडीआरएफ टीमचे पीएसआय विजय गावंडे, पीएसआय तायडे, पोलीस नाईक मदन बाविस्कर, पोलीस शिपाई अनिल वाघ, हवालदार महेश मोरे, ललित मोरणकर, समाधान महाजन, प्रशांत महाजन, सुनील महाले, सुरेश गोसावी यांच्या पथकाने पंढरपूरसह नांदेड व हिंगोली येथील चंद्रभागा नदीला आलेल्या पुरात वाहून जाणार्या १२ भाविकांना आपल्या साधनसामुग्री व कुशल बुद्धिमत्तेच्या जोरावर पाण्यातून बाहेर काढून वाचवले. यामुळे पुन्हा एकदा धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे नाव या जवानांच्या शौर्यामुळे देशभर पसरले.