– सुतार, लोहार, सोनार समाजांसह १८ समाजांना होणार फायदा
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागीरांना देण्यात आलेल्या कर्जावर, सरकारकडून ८ टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमादरम्यान केली. या योजनेसाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १३ हजार कोटी रुपयांची तरतूद आधीच करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
आज समय की मांग है कि हजारों वर्षों से भारत की समृद्धि के मूल में रहे हमारे विश्वकर्मा साथियों को पूरा सम्मान मिले और उनके सामर्थ्य को अधिक से अधिक बढ़ावा दिया जाए। pic.twitter.com/Qzx729NcFb
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2023
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागीरांना ५ टक्के इतक्या परवडण्याजोग्या व्याजदरानं तारणमुक्त कर्ज देण्यात येणार असल्याचेही अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नमूद केले. या योजनेत सुतार, सोनार, लोहार, गवंडी, दगडी शिल्पकार, नाभिक आणि नौका बांधणार्यांसह एकंदर १८ क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना सरकारकडून ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येईल. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात १ लाख रुपये दिले जातील आणि १८ महिन्यांनी ही रक्कम फेडल्यानंतर लाभार्थ्याला अतिरिक्त दोन लाख रुपये घेता येतील, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
योजनेचा जास्तीत जास्त समाज बांधवांनी लाभ घ्यावा – सतिश शिंदे
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा जास्तीत बारा बलुतेदारांसह सुतार समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बारा बलुतेदार समाजाचे तथा सुतार समाजाचे नेते सतिश शिंदे यांनी केले आहे. योजनेसंदर्भात एकाद्या समाज बांधवाला काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असेही शिंदे म्हणाले. या योजनेच्या लॉन्चीगप्रसंगी शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने सुतार समाज बांधव नवी दिल्ली येथे गेले होते. याप्रसंगी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ग्रूपचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक पुरूषाेत्तम सांगळे, सुतार समाजाचे नेते सतिश शिंदे यांनी पंतप्रधान माेदी यांना भेटून त्यांचे सर्व समाजाच्यावतीने आभारही व्यक्त केले आहेत.