BULDHANAHead linesVidharbha

मेहकरचे बीडीओ झाले तेलंगणा सरकारच्या योजनेवर प्रभावित; चक्क राजीनामा देत स्वीकारला बीआरएसचा मार्ग!

बुलढाणा (संजय निकाळजे) – शेती हा डबघाईसव आलेला व्यवसाय… दिवसेंदिवस होणार्‍या आत्महत्या थांबवणे जणू अशक्यच आहे, अशी जवळजवळ मानसिकता झाली असताना तेलंगाना सरकारने आत्महत्या शून्यवर तर आणल्याचं आहे, पण तेथील शेतकर्‍यांसाठी विविध योजना देखील आणल्या आहे. या योजना पाहून प्रभावित झालेल्या बुलढाण्याच्या अधिकार्‍यांने नोकरीचा राजीनामा देत केसीआर यांच्या बीआरएस (भारत राष्ट्र समिती)चा मार्गावर अवलंब केला आहे. गजानन पाटोळे असे त्या अधिकार्‍याचे नाव असून, ते मेहकर येथे बीडीओ म्हणून कार्यरत होते.

नोकरीत असताना गजानन पाटोळे यांचा पिंड सामाजिक असल्याने त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा होता. सामान्य माणूस हक्काने त्यांच्याकडे येत असे. मुलीच्या शैक्षणिक कार्यासाठी पाटोळे यांना सहा महिन्यापूर्वी हैदराबादला जावे लागले. तिथे तीन-चार दिवस थांबावे लागले. थांबले असतात त्यांनी तेथील सरकारच्या शेतीविषयक धोरणा विषयी ऐकले. यातूनच त्यांची उत्सुकता वाढली व त्यांनी हैदराबाद व परिसरात सरकारच्या रोल मॉडेलची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शेतीत बदल करता येतो …तो शक्य आहे. त्यासाठी फक्त मानसिकता हवी हे ध्यानात येताच त्यांनी मुख्यमंत्र्यांचे भेटीची वेळ मागितली. तीन महिन्यानंतर त्यांना भेट मिळाली. मुख्यमंत्री के. सी. आर. यांच्या भेटीनंतर पाटोळे यांनी नोकरीला राजीनामा ठोकत बीआरएसचा मार्ग अवलंब केला. बारा वर्षे नोकरी बाकी असताना पाटोळे तेलंगणा मुख्यमंत्री के सी आर यांच्या कामाने प्रभावी झाले. महाराष्ट्रात हे कार्य शेतकरी वर्गासाठी पुढे न्यावे लागेल असे ते म्हणतात. विशेषता शेतकरी वर्गासाठी हा कृतिशील पर्याय असल्याचे पाटोळे यांचे म्हणणे आहे. नोकरी मिळवणे अत्यंत कठीण काम. त्यात एमपीएससी द्वारा नियुक्त चांगल्या पदावरची नोकरी व वर् कमाईला वाव असणार्‍या खुर्चीत असताना राजीनामा देणे शक्यच नाही.मात्र बळीराजा रोज नागवला जातोय हे पहावत नाही. काहीतरी केलं पाहिजे हीच भावना या मागे असल्याचे पाटोळे म्हणाले.


मुख्यमंत्री KCR म्हणाले, ‘आवो कुछ करते है..’!

मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता तुमच्यासारखे शिक्षित लोक समाजाला चांगलं काय ते सांगू शकतात. आवो कुछ करते है असे म्हणत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पाटोळे यांचे स्वागत केले. यावेळी मंत्रिमंडळातील उच्च पदस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र प्रभारी शंकरआण्णा धोंडगे, राज्य अध्यक्ष माणिक कदम, मुख्यमंत्री यांचे विश्वासू साईदीप, निखिलबाप्पू देशमुख आदींनी त्यांचे स्वागत केले. लवकर त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!