MEHAKARVidharbha

वाहकाची मुजोरी; विद्यार्थिनींना बसमधून खाली उतरविले!

मेहकर (अनिल मंजुळकर) – डोणगाव ते राजगड जाणार्‍या बसमधून मुजोर वाहकाने विद्यार्थिनींना उतरून देण्याचा धक्कादायक प्रकार आज सायंकाळच्या सुमारास उघडकीस आला. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी अन्य एका बससमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी माफी मागितल्यानंतर व पुन्हा असे होणार नाही, असे सांगितल्यानंतरच या मुली रस्त्यावरून उठल्या.

मेहकर डेपोची बस डोणगाव येथून शाळकरी मुलींना घेऊन डोणगाव ते राजगडला जाताना बसच्या मुजोर वाहकाने या मुलींना बसमधून खाली उतरून दिले, व पांगरखेड माध्यमिक शाळेतील विद्यार्थी घेऊन बसचालक व वाहक पुढील गावाकडे रवाना झाले. शासनाने स्त्रियांना प्रथम दर्जा दिला. मात्र मुलींना सध्याकाळच्यावेळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान गाडीमधून उतरुन दिल्याने मुली व पालकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे या मुलींनी एका बससमोरच जवळपास तासभर ठिय्या आंदोलन केले. या संदर्भात, संबंधीत चालक आणि वाहक यांना विचारले असता, आम्ही अगोदरच त्यांना सांगितले होते, असे उर्मट उत्तर त्यांच्याकडून आले. मुली बससमोरून उठत नसल्याने एसटी महामंडळाच्या अधिकारी भोसले यांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी डोणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी खंडागळे व इतरांना माहिती मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले. घटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर डोणगाव कंट्रोल पॉइंटचे अधिकारी भोसले यांनी दिलगिरी व्यक्त केली. यानंतर असे विद्यार्थिनींसोबत घडणार नाही, अशी मी ग्वाही देतो, असे ते म्हणाले. यावेळी पांगरखेड येथील गणेश इंगळे, गोपाल पाखरे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. दिलगिरीनंतर विद्यार्थिनींनी आपला ठिय्या मागे घेत बस जाऊ दिली.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!