ChikhaliHead linesVidharbha

मनसे शेतकरी सेना व विद्यार्थी सेना मदतीचे साहित्य घेऊन पूरग्रस्त भागांकडे रवाना!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना व विद्यार्थी सेनाच्यावतीने पाच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे बहुसंख्य गावे ही पूरग्रस्त झाली. त्या गावांतील नुकसान झालेल्या बांधवांना आज मदत घेऊन मनसे शेतकरी सेना व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते रवाना झाले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सामाजिक बांधिलकी आणि मदत देण्याच्या आवाहनाला साथ देत मनसेचे संपर्क अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष, बुलडाणा/ अकोला संपर्क अध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हासंघटक शैलेश गोंधणे यांच्या नेतृत्वात शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष शैलेश कापसे, तालुका अध्यक्ष विनोद खरपास, उपतालुकाध्यक्ष अरुण येवले, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी रवाना झाले आहेत. जळगाव जामोद, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यांतील काही गावांत झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे जवळपास १ लाख हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. २०३ गुरे दगावली आहेत. २२८६ नागरिक बेघर झाले आहेत. याव्यतिरिक्त कित्येकांच्या भिंती खचल्या, घरातले अन्नधान्य, स्वयंपाकाची भांडी, कपडे सगळ काही पुराने वाहून नेले आहे.

सरकार त्यांच्या पद्धतीने मदत करत आहे, मात्र आपले समाजबांधव या नात्याने ती आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे ती जबाबदारी उचलन्याचा उदात्यहेतू मनात ठेवून आपल्या व लोक सहभागातून संकलित झालेल्या साड्या, घरातील, वापरण्यायोग्य नव्या, जुन्या साड्या, लहान मुलांचे कपडे, पुरुषांचे कपडे, पीठ, दाळ, तांदुळ, तेल यासह चटाया व ब्लँकेटची मदत घेऊन मनसेची चमु रवाना झाली आहे. यासह जनतेला आव्हान करण्यात आलेले आहे की, अजूनही कोणाला मदत देण्याची इच्छा असेल तर त्यांनी आपली मदत सिद्ध सायन्स मंदिरावर पोहचती करावी. आपली मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढची ट्रीप दोन तीन दिवसात रवाना होणार आहे. यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष स्वप्निल असोले, उपतालुकाध्यक्ष अंकित इंगळे, अथर्व गोंधणे, सचिन सोळंकी, जयदीप डोंगरे, शुभम नानोटे, युसूफ शेख, सुमित भगत हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!