– पुढील वर्षी स्थानिक महिला बचत गटाकडून शिलाई करून गणवेश देण्यात येणार!
बुलढाणा (संजय निकाळजे) – आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून, काही ठिकाणी शाळा १५ जूनला सुरू झाल्या आहेत. तर काही ठिकाणी २६ जूनपासून शैक्षणिक क्षेत्राला सुरुवात होणार आहे. असे असताना शालेय शिक्षण विभागाने गणेशाबाबत नवा निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य पातळीवर समान गणवेश देण्याचा हट्ट मागे घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने देण्याच्या आदेशानंतर आता स्काऊट आणि गाईड विषयासाठी एक समान गणवेश शासनाकडून उपलब्ध करून न देता, आता या गणवेशाचीही जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकण्यात आली, हे स्पष्ट झाले आहे. पुढील वर्षी महिला बचत गटाकडून गणवेशाची शिलाई करून एक समान एक रंगाचे दोन गणवेश देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश देण्याची घोषणा केली होती. मात्र अनेक शाळांनी गणवेश वाटपाची प्रक्रिया सुरू केल्याने नव्या शासकीय योजनेमुळे त्यात अडचणी निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शासनाकडून दोन गणवेशाऐवजी एक गणवेश देण्याच्या निर्णय झाला. तर दुसरा गणवेश आता शाळा व्यवस्थापन समितीने देण्याचा मध्यम मार्ग काढण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शैक्षणिक वर्ष२०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करून तीनशे रुपयाचा एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने देण्याचे आदेश दिले. तर शासन स्तरावरून सूचना मिळाल्यानंतर उर्वरित एका गणेशबाबत पुढील कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे शासनाकडून मिळणार्या दुसर्या गणेशावर प्रश्नचिन्ह व निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नवा शासन निर्णय प्रसिद्ध करून गणवेश बाबतच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले.
समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समिती मार्फत द्यावा. त्यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने परिषदेचे राज्य प्रकल्प संचालकांनी विचारीत करावा. मोफत गणवेश योजनेअंतर्गत अनेक शाळांनी आणि कापड उद्योजकांनी विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय सन २०२३-२४ या वर्षासाठीचे गणवेश तयार केले. तयार गणेशामुळे संबंधितांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने शाळा व्यवस्थापन समिती उपलब्ध करून दिलेल्या निधीमधून सन २०२३ २३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा असे आदेश आहेत. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे सन २०२४-२५ पासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून एक समान एक रंगाचे दोन गणवेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये मोफत गणवेश योजनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करू नये याबाबतचे आवश्यक त्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे दिल्या जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
———–