आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्रीक्षेत्र आळंदी हुन पंढरपूर कडे माऊलींचा पालखी सोहळा हरिनाम गजरात वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात पोहोचला. यावेळी ट्रस्टच्या वतीने मंदिरात रांगोळीच्या पायघड्या, पुष्पसजावटीसह हरिनाम गजरात सोहळ्याचे पुण्यनगरीकडे जाताना प्रवासात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी श्रींचे पादुकांची आरती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर यांचे हस्ते सपत्नीक आरती व महापूजा करण्यात आली. यावेळी श्रींचे पूजेचे पौरोहित्य अमोल गांधी यांनी केले.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे पाटील, पालखी सोहळा मालक ह.भ.प बाळासाहेब आरफळकर, पालखी सोहळ्याचे चोपदार, राजाभाऊ चोपदार, दिघी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र पंडित, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे, माजी नागरविका सुवर्णा बुर्डे, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, योगीराज कुर्हाडे, योगेश् आरु यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ उपरणे देवून श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अॅड विष्णू तापकीर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मनोहर भोसले, हभप रमेश घोंगडे, रवींद्र गायकवाड, राजेंद्र नाणेकर, साहेबराव काशीद यांचेसह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पालखी सोहळ्यातील वैभवी पादुकांची पूजा करून पादुकाना पुष्पहार, तुळशीहार, श्रीफळ अर्पण करण्यात आला. श्रींची आरती हरिनाम गजरात झाली. श्रीना महानेवैद्य वाढविण्यात आला. पंचक्रोशीतील वारकरी, भाविक मोठ्या संख्येने सोहळ्याचे परंपरेने स्वागत व दर्शनास उपस्थित होते.
—————–