– विवेकानंद विद्या मंदिराचा निकाल १०० टक्के!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रम संचालित विवेकानंद विद्या मंदिराने आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून, शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेची किमया बुधवानी ही विद्यार्थिनी तब्बल ९९.४० टक्के घेऊन पहिली आली आहे.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांनी स्थापित केलेल्या या शैक्षणिक संकुलाने राज्यभरात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने नाव कमावलेले आहे. विवेकानंद विद्या मंदिराचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला असून, कु. किमया बुधवाणी ९९.४० टक्के, कु. जागृती यादव ९५ टक्के, तनिष्क वायाळ ९५ टक्के, बनारस चांदगुडे ९४.४० टक्के, कु. दर्शना राऊत ९३ टक्के, कु. धनश्री राठी ९२.२० टक्के, ऋषिकेश बंगाळे ९२.२० टक्के, कु. प्रियंका जटाळे ९२.२० टक्के, कु. आदिती सरकटे ९१.६० टक्के, कु. समृध्दी पाठक ९०.२० टक्के, प्रणव गव्हाळे ९०.२० टक्के, राज भुसारी ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
विवेकानंद विद्या मंदिरातून दहावीच्या परीक्षेला २३६ विद्यार्थी बसले होते. विवेकानंद विद्या मंदिराचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णूपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते यांचेसह विश्वस्त मंडळ व विवेकानंद विद्या मंदिराचे प्राचार्य आर.डी.पवार, उपप्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विशेष बाब म्हणजे, मुख्याध्यापक / प्राचार्य आर. डी. पवार सर यांच्या कुशल नेतृत्वात संस्थेने पहिल्यांदाच इतके मोठे घवघवीत यश प्राप्त केले आहे.
—————