BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

गाव जवळ आले अन् मृत्यूने गाठले; मेहकर, लोणार, चिखली तालुक्यांवर शोककळा!

UPDATE : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येका १० लाखाची मदत जाहीर!

सिंदखेडराजा येथील पळसखेड चक्का गावाजवळ झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्पेâ प्रत्येकी दहा लाख रुपये तत्काळ द्यावेत, तसेच जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या अपघाताविषयी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने थेट मुख्यमंत्र्यांना फोनद्वारे कळविले होते. ही माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाकडून माहिती घेतली, तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे निर्देश दिले.


मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – भरधाव बस आणि भरधाव कंटेनर यांच्यात सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे मेहकर-सिंदखेडराजा रोडवर झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालक, बस चालकांसह सहा जण ठार झाले असून, तीन प्रवासी अत्यवस्थ आहेत. त्यांना जालना व छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. तर एकूण २३ प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर सिंदखेडराजा, जालना व छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेले सहाजण हे मेहकर, लोणार, चिखली तालुक्यातील असून, गाव अगदी काही मिनिटांवर आले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. त्यामुळे या गावांत शोककळा पसरली आहे.

या दुर्देवी अपघातात एसटी बसचालक राजू तुकाराम कुलाल (वय ४५) रा. वडगाव तेजन, ता लोणार, शेषराव उत्तमराव खराबे (वय ६५) रा. अंत्री देशमुख, ता. मेहकर, संकर्णाबाई रामदास खिलारे (वय ४५) रा. केळवद, ता. चिखली, वनमाला किशोर पवार (वय ३०) रा. बेलगाव, ता. मेहकर, सीमा सोमेश्वर जोशी (वय ५०) रा. मेहकर यांचा जागीच मृत्यू झाला असून, कंटेनर चालक हा परराज्यातील असल्याने त्याचे नाव कळू शकले नाही. सुनील वसंत वाघ (वय ४३) रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जया संजय पाटोळे (वय ३५) रा. जाधववाडी, ता. चिखली, श्वेता संजय पाटोळे (वय १५) रा. जाधववाडी, ता. चिखली, उल्हास विष्णूदास दुबे, रा. बालागिरी हजारीबाग, झारखंड, लीलाबाई यादव माने (वय ७७) रा. मेहकर, वच्छलाबाई मोहन चव्हाण (वय ५०) रा. रा. मेहकर, मंजुळा विशाल शिर्वेâ (वय २५) रा. मेहकर, प्रल्हाद देशमुख, रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, हर्षदा संजय पाटोळे, रा. जाधववाडी, ता. चिखली हे प्रवासी अत्यवस्थ असून, यातील तिघांची प्रकृती अतिचिंताजनक असल्याचे सांगण्यात आले असून, त्यांच्यावर अतिवदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. जखमींच्या वैद्यकीय उपचारासाठी एसटी महामंडळाने आर्थिक मदत दिलेली आहे. अपघातातील मृतांचे शवपरीक्षण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले आहेत. या दुर्देवी घटनेचा अधिक तपास एसटी महामंडळ व सिंदखेडराजा पोलिस करत आहेत.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!