देऊळगाव साकरशातील मृतकांच्या कुटुंबीयांचे आ. रायमुलकरांकडून सांत्वन!
बुलढाणा /मेहकर (जिल्हा प्रतिनिधी) – तीन वाहनांच्या विचित्र अपघातात मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मेहकर ते खामगाव रोड़वर देऊळगाव साकरशानजीक 6 एप्रिलरोजी रात्री आठ वाजेदरम्यान घड़ली होती. सदर तीनही मृतक जीवलग मित्रांच्या कुटुंबीयांची काल, 8 मे रोजी संध्याकाळी आ. ड़ॉ. संजय रायमुलकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले. ‘आम्ही सोबत आहोत, धीर सोड़ू नका’, असा आधारही त्यांनी यावेळी कुटुंबीयांना दिला. यावेळी आमदारांनाही गहिवरून आले.
दुचाकी, इर्टिगा व पीकअप व्हॅन अशा तीन वाहनांच्या विचित्र अपघातात देऊळगाव साकरशा येथील युवा सेना शहर प्रमुख (शिंदे गट) शे. इरफान शे.हुसेन, सचिन उर्फ गोलू सुभाष नहार व लक्ष्मण सीताराम गवळी या तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला होता. ही दुर्देवी घटना मेहकर ते खामगाव रोड़वर देऊळगाव साकरशानजीक घड़ली होती. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. सदर तीनही जीवलग मित्रांच्या कुटुंबीयांची मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी काल भेट घेऊन सांत्वन केले. “झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, आपण धीर सोड़ू नका, आम्ही सोबत आहोत’, त्यांनी कुुटुंबीयांना आधार दिला. यावेळी आ.रायमुलकरांनाही गहिवरून आले. याप्रसंगी समाधान साबळे, सरपंच संदीप अल्हाट, रोहीदास जाधव, देविदास समुद्रवार, सेना शहरप्रमुख दिलीप नवत्रे, शे.अबरासह मृतकांचे कुटुंबीय, नातेवाईक व गावकरी उपस्थित होते.
माजी जि.प. अध्यक्षपती चित्रांगण खंड़ारे यांनीही केले सांत्वन
बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. अलकाताई खंड़ारे यांचे पती तथा काँग्रेस नेते चित्रांगण खंड़ारे यांनीही उपरोक्त मृतकांच्या कुटुंबियांची आज, ९ मेरोजी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पैठणे, माजी सरपंचपती बाळू वानखडे, रफीकभाई, पत्रकार गणेश पाटीलसह मृतकांचे कुटुंबीय व गावकरी उपस्थित होते.
—————–