ChikhaliVidharbha

‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमली गुंजाळा नगरी!

चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – महाराष्ट्रातील लाखो लोकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यासाठीं गुंजाळा येथे बाळू गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून भव्यदिव्य मंदिर उभारण्यात आले, आणि मंदिरामध्ये खंडोबाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापणेसाठी २७ एप्रिलरोजी गावात ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या गजराने डफड्याच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे गल्लोगल्लीत हळद-भंडाराची उधळण करत आनंद साजरा केला गेला.

चिखली तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले गुंजाळा गाव हे एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये पन्नास टक्के वंजारी समाज आणि पन्नास टक्के बौद्ध समाजाचे वास्तव्य आहे. पूर्वीपासून या गावात दोन्ही समाजात एकोपा असल्याने गावकर्‍यांनी लोकवर्गणीतून भव्यदिव्य मारुती मंदिर, आई भवानी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. गोपीनाथजी मुंडे, गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. या गावात खंडोबा हे कुलदैवत असलेले अनेक भाविक भक्त आहेत. या भाविक भक्तांनी बाळू गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणी जमा करून आईभवानी मंदिराशेजारी पूर्वीच्या जागेवर भव्यदिव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण केले, आणि मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठीं मोठ्या संख्येने गावकर्‍यांनी सहभाग घेवून २७ एप्रिलरोजी गावातून डफड्याच्या गजरात हळद-भंडारा उधळत ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट, जयमल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, असा जयजयकार करत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुक सुरू असतांना महिलांनी घराबाहेर रंगीबेरंगी रांगोळी काढून खंडोबा देवाच्या मूर्तीचे दर्शन घेवून पूजन केले. आणि मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना होताच शेकडो भाविक भक्तांनी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत आनंद साजरा केला. यावेळी बाळू गावडे, निवास मोरे, विठोबा मोरे, बंडू केदार, सोनू इंगळे, संजय गायकवाड, गजानन दाताळ, किशोर निबाळकर, शेषराव तायडे, नामदेव काळे, संजय पडघान, काकड, माजी सरपंच दीपक केदार, पत्रकार प्रताप मोरे, श्रीराम केदार, गजानन केदार, सुधाकर वणवे, सुनिल आटोळे, नारायण मोरे, सौदा केदार, परसराम नागरे, बबन वाघमारे, सुनिल मोरे, बंडू गवई, युवराज खिल्लारे, अंकुश केदार, बबन सावकार, सिध्दार्थ गवई, बबन मोरे, विजयानंद मोरे, अरूण मोरे, बंडू घुगे, वामन बिबे, गणेश केदार, दयानंद गवई, अशोक मोरे आदी गावकर्‍यांसह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!