बुलडाणा (खास प्रतिनिधी) – स्थानिक नगरपालिकेला नुकताच राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचा पाच कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला. दरम्यान नगरपालिकेने आरोग्य विभागासाठी कचरा नियंत्रणाकरिता सात घंटा गाड्या व दोन मिनी ट्रॅक्टर विकत घेतले. या वाहनांचे आज 21 एप्रिल रोजी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
शहरातील आरोग्य अबाधित रहावे यासाठी नगरपालिका प्रयत्न करत आहे. स्वच्छते संदर्भात मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे प्रयत्न जारी आहेत. आज शहरातील विविध कामांची आढावा बैठक घेण्यात आली. शहरात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा संबंधित खात्यांचे कर्मचारी व शासकीय कंत्राटदार यांच्या उपस्थितीमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी घेतला. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, शिवसेना शहर कार्याध्यक्ष आकाश दळवी, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, विजय जायभाये, अरविंद होंडे, मोहन पऱ्हाड, गोटू शर्मा, जीवन उबरहंडे, दीपक तुपकर,ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी,अधिकारी उपस्थित होते.