SOLAPUR

रे नगरच्या लाभार्थ्यांना 175 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पंतप्रधान यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला रे नगर गृहनिर्माण प्रकल्प, कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील घरकुल च्या 10 हजार लाभार्थ्यांना जवळपास 175 कोटी ररुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

रे नगर कुंभारी येथे जवळपास 30 हजार घरकुल असंघटित कामगारांना बांधून देण्यात येणार आहे. त्यापैकी जवळपास दहा हजार घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. या दहा हजार घरकुलच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हातामध्ये चावी पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. सध्या या रे नगर मधील घरकुलच्या लाभार्थ्यांना दररोज 30 ते 40 लाख रुपयाचे कर्ज वाटप केले जात आहे. सद्या या ठिकाणी प्रामुख्याने मूलभूत सुविधाची कामे सुरू आहेत. त्यासाठी मुख्य म्हणजे एनटीपीसी येथून पाईपलाईनचे काम सुरू आहे. याबरोबरच वीज, ड्रेनेज लाईन हे काम करणे प्रामुख्याने सुरू आहे. याबरोबर काही घराचे बांधकाम पहिल्या टप्प्यात आहे तर काही घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे जसे बांधकाम पूर्ण आहे त्याप्रमाणे कर्ज दिले जात आहे. त्यामुळे या कर्जाचे वाटप झाल्यामुळे कामाला गती मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!