Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraVidharbha

‘समृद्धी’चा महामार्ग नव्हे; मृत्यूचा सापळा! दुसरबीडजवळील भीषण अपघातात पती-पत्नी ठार!

सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून, सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीडजवळ क्रेटा कारला पाठीमागून एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात, पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली. पुण्याहून नागपूरच्या दिशेने भरधाव जाणारी एक कार दुसर्‍या कारला पाठीमागून धडकल्याने ही दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमित पाध्ये आणि ईश्वरी पाध्ये अशी मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. तर आशीष पाध्ये असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

समृद्धी सदर मार्गाने क्रेटा कार क्रमांक एमएच १४ एफजी ९१ ०७ चे चालक आशीष पाध्ये त्यांच्या आई-वडिलांसह नागपूरकडे जात होते. त्याचवेळी पोलीस स्टेशन सिंदखेडराजा हद्दीत आशीष यांच्या कारला पाठीमागून वाहनाची धडक बसली, ही धडक इतकी भीषण होती की कारमधील चालकाची आई ईश्वरी पाध्ये (वय ६०) आणि वडील अमित पाध्ये (वय ६७) हे अपघातामध्ये जागेवरच मरण पावले व चालक आशीष पाध्ये यांच्या हाताला मुका मार लागला असून, किरकोळ जखमी झाले. अपघाताची घटना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल होते. पोलिसांनी मयत व्यक्तींना अ‍ॅम्बुलन्सच्या सहाय्याने सिंदखेडराजा सरकारी हॉस्पिटल येथे पाठवले. अपघातग्रस्त वाहनला क्रेनच्या साह्याने पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे रवाना केले.


मिळालेल्या माहितीनुसार, पाध्ये कुटुंब काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. पुण्याहून परत येत असताना, दुसरबीडजवळ समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवर समोर जाणार्‍या कारला त्यांच्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कार जागीच उलटली. या भीषण अपघातात अमित पाध्ये आणि ईश्वरी पाध्ये यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक मुलगा आशीष पाध्ये हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी मृत पती-पत्नीचे मृतदेह आपल्या ताब्यात घेतले. तर आशीष पाध्ये याला सिंदखेडराजा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्याला खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!