BULDHANACrime

“गायछाप” तंबाखूच्या 32 गोण्या लंपास; दुकानदाराला 2 लाखाचा चुना!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) –  अलीकडे चोरटे कुणाला चुना लावतील हे कळेनासे झाले आहे. देऊळगावराजा शहरातील जालना मार्गावरील रामदेव एजन्सीच्या गोडाऊनचे शटर तोडून चोरट्यांनी दोन लाख 14 हजार रुपयांच्या गायछाप तंबाखूच्या 32 गोण्या लंपास करून गोडाऊन मालकाला चांगला चुना लावला. ही घटना 14 मार्च च्या मध्यरात्री घडली असून, 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

देऊळगावराजा येथील शनि मंदिर परिसरात राहणारे गोविंद रमेशचंद्र सराफ यांचे चंदा एजन्सी व किराणा दुकान तसेच त्यांचे जालना मार्गावर रामदेव एजन्सी नावाचे तंबाखूचे गोडाऊन आहे. या गोडाऊन मध्ये ठेवलेले 2 लाख 14 हजार 400 रुपये किमतीच्या गायछाप जर्दा तंबाखूच्या 32 गोण्या अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून लंपास केल्याचे 15 मार्चला समोर आले.  याबाबत गोविंद रमेशचंद्र सराफ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविलाअसून, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!