आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील सिद्धबेटात आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळ विभागातील कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार एम. डी. पाखरे यांच्या वाढदिवसानिमित्त १०३ तुळशीची रोपे लावून अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करीत भारतीय संस्कृती, परंपरा जतन करण्यासाठी तुळशीचे महत्त्व ओळखत तुळस रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक असलेली तुळस लावत भारतीय संस्कृती जतन करण्यात आली. वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक असल्याने तुळस लावण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते राहुल चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी माऊली दास महाराज, भक्तीशक्तीचे अध्यक्ष संदीप लोहर महाराज, संयोजक राहुल चव्हाण, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर,काँग्रेसचे नेते नंदकुमार वडगावकर, पांडुरंग कांबळे, हमीद शेख, विठ्ठल शिंदे, पितांबर लोहार, दिनेश कुऱ्हाडे, अनिल जोगदंड, ज्ञानेश्वर उर्फ बापू कुऱ्हाडे, सुखदेव वहिले, सुरेश काचगुंडे महाराज, सचिन शिंदे, हिरामण तळेकर, योगेश तळेकर यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर, वारकरी संप्रदायातील वारकरी साधक विद्यार्थी उपस्थित होते. संत लिला भूमी आळंदी सिद्धबेट येथे वेदमंत्र जय घोषात तुळशीरोप लावण्यात आली. यावेळी आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने ज्ञानेश्वर चव्हाण आणि महादेव पाखरे यांचा सत्कार करण्यात आला. पसायदान गायनाने उपक्रमाची सांगता करण्यात आली. साई मंगल कार्यालयामध्ये पाखरे व चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते मनोहर दिवाने, पांडुरंग कांबळे, नंदकुमार वडगावकर , शिक्षण मंडळ सभापती श्रीधर कुऱ्हाडे, शोवजी घोडे आदींनी मनोगते व्यक्त केली. संयोजन अलंकापुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे, राहुल चव्हाण, पंकज पाखरे यांनी केले. गौतम पाटोळे यांनी लिहिलेले मानपत्र उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी सुत्रसंचलन केले. आभार संकेत वाघमारे यांनी मानले.