बुलढाणा (खास प्रतिनिधी) – जिल्हा अंतर्गत पोलिसांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पारित केले.
जिल्हा पोलीस दलाची स्थापना मंडळाची बैठक २४ फेब्रुवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ आणि प्रस्थापित सुधारणा अध्यादेश २०१५ मधील प्राप्तधिकाराचा वापर करून जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांची जिल्हा विशेष शाखा बुलढाणा येथे, सुरक्षा शाखा बुलढाणाचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप वडगावकर यांची शेगाव ग्रामीण पोलीस ठाणेदारपदी, एमआयडीसी पोलीस स्टेशन मलकापूर ठाणेदार पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांची प्रभारी अधिकारी म्हणून जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलढाणा येथे बदली करण्यात आली आहे. तर जिल्हा वाहतूक निरीक्षक शाखा बुलढाणाचे पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांची खामगाव शहर ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली. नियंत्रण कक्षाचे बुलढाणा पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांची मलकापूर एमआयडीसी ठाणेदार पदी बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांची प्रभारी अधिकारी म्हणून सायबर शाखेत बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षा बुलढाणाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण पावर यांची कल्याण शाखा बुलढाणा येथे तर कल्याण शाखा बुलढाणाचे पोलीस निरीक्षक धुळे यांची सुरक्षा शाखा बुलढाणा येथे प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. सदर बदल्यांचे आदेश २४ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी पारित केले आहे.