चिखली (तालुका प्रतिनिधी) – दि १९ फेब्रुवारी हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती दिन. या निमित्ताने अंत्री कोळी गावात शिवराजे मित्र मंडळ माजी सरपंच विठ्ठल गिरी यांच्या नेतृत्वात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या मोटारसायकल रॅलीने संपूर्ण गावचे वातावरण शिवमय होऊन गेले होते. या मोटारसायकल रॅलीत गावातील संपूर्ण युवक सहभाग घेतला होता.
रॅलीत सहभागी झालेल्या युवकांच्या डोक्यावर भगवे फेटे बांधलेले होते. तसेच त्यांच्या मोटार सायकल वाहनावर भगवे ध्वज, जय भवानी जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी अंत्री कोळी नगरी दुमदुमून गेली होती. ही मोटर सायकल रॅली संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून ग्रामपंचायतमध्ये महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहारांमध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीची सांगता करण्यात आली.
सायंकाळी सहा वाजता मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावामध्ये प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आले होते व दिवे लावण्यात आले होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन तिथून पुढे मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातील सर्व समाज बांधव शिवप्रेमी शिवभक्त यावेळी हजर होते. विशेष महिलांनी हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. साडेनऊ वाजता मिरवणूक संपन्न झाली. त्यावेळी शिवराजे मित्र मंडळ, रायपूर पोलिस स्टेशन बीट जमदार रवींद्र पवार, साहेब शितोळे सर यांनी मिरवणूक शांततेत झाल्याबद्दल सर्व गावकर्यांचे आभार व्यक्त केले.