गुंजाळा, ता. चिखली (सुनील मोरे) – सालाबादाप्रमाणे गुंजाळा या गावी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून तर दुपारपर्यंत भाविक भक्तांच्या टाळ मृदंगाचा गजर आणि गण गणात बोते आवाजाने गुंजाळा नगरी दुमदुमून गेल्याचे पाहायाला मिळाले. प्रगटदिन उत्साहात साजरा झाला.
गुंजाळा येथील स्व. त्र्यबकराव केदार यांच्या मुलांनी व नातवडांनी गावालगत एक किलोमीटर अंतरावर स्वत:च्या शेतात भव्यदिव्य श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिराची स्थापना केली. आणि श्री च्या मंदिरावर प्रगटदिनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमप्रसंगी सकाळी श्री च्या प्रतिमेची गावातून भव्य दिंडी काढण्यात आली. महिलांनी आप आपल्या घरापुढे सडा सारवण व रांगोळी काढून दिंडीतील भाविक भक्तांचे आणि प्रतिमेचे पूजन केले. गावातून टाळ मृदंगाच्या गजरात भाविक भक्तांनी गण गणात बोते आवाजात श्री ची मिरवणूक काढण्यात आली. या भक्तिमय वातावरणाने गुंजाळा नगरी दुमदुमून गेली होती. तसेच मंदिरात अकरा वाजेपासून कीर्तनकार आपले कार्यक्रम साजरे करीत होते. प्रगटदिनी शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.