मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – राज्य परीक्षा परिषदमार्फत शिक्षण विभागाने घेतलेल्या एन.एम.एम.एस २०२२/२३ शिष्यवृत्ती परीक्षेत मेरा बुद्रूक येथील श्री.शिवाजी हायस्कूलच्या १६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील इयत्ता आठवीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना बुद्धिमान सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी, सातवीत किमान ५५ टक्के गुण, लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांची गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड होते, आणि पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अशा या केंद्र शासनाच्या एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत मेरा बुद्रुक येथील श्री.शिवाजी हायस्कूल मधील आठवीच्या १६ विद्यार्थ्यांना शाळेच्या तासिकेवर शिक्षण देणारे शिक्षक हर्षल पडघान आणि प्रशांत पडघान यांच्या मार्गदर्शनाखाली घवघवीत यश प्राप्त केले. त्यांच्या या यशाबद्दल श्री.शिवाजी हायस्कूलच्यावतीने यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख सर, सोळंकी सर, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एन.एम.एम.एस २०२२/२३ शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणार्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये भक्ती संजय गायडे, प्रतीक्षा तेजराव पडघान, वेदांती दिगंबर पडघान, वेदिका संतोष पडघान, शुभम दीपक हिवाळे, वैभव संतोष पडघान, पूर्वा रामेश्वर चेके, प्रफुल लक्ष्मण पडघान, दिव्या संदीप गवळी, श्रुती कडूबा हिवाळे, भूषण संतोष मापारी, प्रसाद ब्राह्मणे, सम्यक विश्वास डोंगरदिवे, पूनम राहुल डोंगरदिवे, अभिषेक संतोष वाकोडे, दीपेश कैलास मोरे आशा एकूण १६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी मारली. १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे मार्गदर्शक तथा ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे संचालक हर्षल पडघान सर यांच्यावर व या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करणारे विद्यार्थ्यांवर सर्वस्तरावरून अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.