सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जातीपातीच्या राजकारणात निवडून आलेले सोलापूरच्या खासदारांनी आजपर्यंत संसदेत कोणतेही प्रश्न मांडले नाही. साधी एक पाण्याची पाईपलाईन सुद्धा आणू शकले नाही. एनटीपीसीच्या माध्यमातून दुहेरी पाईपलाईनसुद्धा शिंदे साहेबांनी मंजूर करून आणली तेही काम आजपर्यंत सुरु करू शकले नाही. काँग्रेस पक्षाने नेहमीच गोरगरिबांसाठी काम केले आहे. कोणतेही अड़चण असू द्या, मी तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन सोलापूर शहर (मध्य)च्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जूना प्रभाग क्रमांक २० मध्ये होणार्या ‘हात से हात जोडो’ अभियानाच्या पूर्वतयारीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. संयोजक युवा नेते नासीर बंगाली यांनी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शास्त्री नगर इराबत्ती कैंटीन येथे महत्वाची बैठक आयोजित केली होती.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात जातिपातीचे राजकारण सुरु आहे. ते लोकहिताचे कुठलेही काम केले नाही, महागाई प्रचंड वाढली, गॅस पेट्रोल, डिझेल प्रत्येक वस्तुचे दर वाढले, अर्थव्यवस्था संकटात आली, बेरोजगारी वाढली. आपल्या उद्योगपती मित्रांचे कर्ज माफ करत आहेत. देशातील सर्व पैसा अदानी ला श्रीमंत करण्यासाठी वपरत आहेत. या कार्यक्रमास नगरसेवक हाजी तौफीक हत्तुरे, जुबेर कुरेशी, अंबादास बाबा करगुळे, शोएब महागामी, नजीर नदाफ, वाहिद नदाफ, वाहिद बिजापुरे, रफीक चकोले, नासीर पठाण, दाऊद नदाफ, जावेद कुरेशी, सादिक कुरेशी, तिरुपती परकीपंडला, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर आदी उपस्थित होते.