चिखली (तालुका प्रतिनिधी) – भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नॅशनल अॅण्टी करप्शन अॅण्ड क्राईम कंट्रोल ब्युरो कार्यरत आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी व बालविवाह, बालमजूर या संपूर्ण विषयावर महाराष्ट्रामध्ये न्याय देण्यासाठी कार्यरत तसेच, सर्वसामान्य माणसाची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी, भ्रष्ट अधिकार्यांवर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने व सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी बुलढाण्यात अॅण्टी करप्शन ब्युरो संघटन मजबूत करण्यात आले. या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलम हुसेन शेख, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कल्याण देवडे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभिजित इंगळे, महाराष्ट्र राज्य सचिव युनूस शेख, महाराष्ट्र राज्य विभागीय अध्यक्ष मारोती बनसोडे यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय शिंदे यांनी बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी मयूर मोरे यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे बुलढाण्यात झंजावात निर्माण करून भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा अधिकाधिक प्रयत्न करून नॅशनल अॅण्टी करप्शन ब्युरोचे संघटन मजबूत करेल, अशी ग्वाही यावेळी मयूर मोरे यांनी दिली आहे.
कुठलाही सरकारी दाखला लाचेशिवाय मिळणे तुमचा हक्क आहे. त्यासाठी लाच का द्यायची? शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरिता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा. नॅशनल एन्टी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल. समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी नॅशनल एन्टी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरोला सहकार्य करा. संघटना प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची पिळवणूक जर कर्मचारी, अधिकारी, प्रशासन करत असेल तर भ्रष्ट अधिकार्यांना सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.