चिखली तालुक्यात मोटारसायकली चोरांचा धुमाकूळ, चिखली, देऊळगाव घुबेतून मोटारसायकली लांबविल्या
मेहकर/चिखली (रवींद्र सुरूशे) – चिखली शहरासह तालुक्यात मोटारसायकली चोरांची टोळी सक्रीय झाली असताना, चिखली पोलिस मात्र झोपेत आहेत. चिखली येथील महालक्ष्मी मार्वेâटच्या कमानीजवळ लावलेली मोटारसायकल तसेच देऊळगाव घुबे येथील खंडोबाच्या जत्रेतून मिसाळवाडी येथील अंकुश भगत यांची मोटारसायकलदेखील चोरट्यांनी लंपास केलेली आहे. या घटनांनी तालुक्यात एकच खळबळ उडालेली आहे.
अमोल अशोक खरात (वय वर्ष ३३) राहणार दीनदयाल नगर वार्ड क्रमांक १२ यांनी चिखली पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांची हिरो होंडा सीडी डीलक्स एमएच २८ एएफ ९०६५ काळ्या सिल्वर रंगाची मोटारसायकल ही लक्ष्मी मार्वेâटच्या कमानीजवळ लावून ड्युटीवर गेले होते. त्यानंतर ते परत आले असता त्यांना तेथे त्यांची मोटारसायकल दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेतला असता मोटारसायकल सापडून न आल्यामुळे लक्ष्मी मार्वेâट चिखली इथून साडेदहा ते अडीच वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेल्याची तक्रार अमोल अशोक खरात यांनी पोलीस स्टेशनला दिली आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस करीत आहे.
तसेच, अन्य एका घटनेत देऊळगाव घुबे येथील खंडोबाच्या जत्रेला गेलेले मिसाळवाडी येथील अंकुश भगत यांची मोटारसायकल क्रमांक एमएच २८ बी २५६६ ही विठ्ठल पाटलांच्या घराजवळ लावलेली होती. ते जत्रेतून परत आले असता त्यांना ही मोटारसायकल दिसून आली नाही. त्यांनी बरीच शोधाशोध केली. तरीही मोटारसायक सापडली नाही. या दोन्ही मोटारसायकली चोरणारी चोरट्यांची टोळी चिखली तालुक्यात कार्यरत असल्याचा संशय निर्माण झाला असून, चिखली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या मोटारसायकलींचा तातडीने शोध लावून ही टोळी जेरबंद करण्याचे आव्हान चिखली पोलिसांसमोर निर्माण झालेले आहे.
——————