विजय राठोड यांच्या निधीतून दोड्डी येथील दलित वस्तीमध्ये बोअरचे उद्घाटन

editor 1 Min Read
1 Min Read

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – कासेगाव गणातील माजी पंचायत समिती सदस्य निर्मला विजय राठोड यांच्या निधीतून दोड्डी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दलित वस्तीमध्ये बोअरचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन आपल्या भागातील नेते व कै. उमाकांत राठोड यांचे चिरंजीव विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संदीप येरवडे यांच्या हस्ते विजय राठोड यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच कलावती मल्लिनाथ गिराम, उपसरपंच लक्ष्मण गावडे, ग्रामपंचायत सदस्य धानाप्पा चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सविता संतोष कोरे, तारासिंग राठोड, सचिन राठोड, ग्रामसेवक संजयकुमार राठोड, पोपट बिराजदार, बाळू येरवडे, लक्ष्मण बनसोडे, विकास होनपारखे आदी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version