काळ्या बाजारात नेण्यात येणारा रेशनचा तांदूळ हिवरा आश्रम येथे पकडला!

editor 1 Min Read
1 Min Read

– मोठे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर येथून चिखली येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असलेला रेशनचा ५० क्विंटल तांदूळ हिवरा आश्रम येथे पकडण्यात आला. या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मेहकर येथून चिखलीकडे विक्रीसाठी रेशनचा तांदूळ जात असल्याची माहिती पत्रकार रमेश चव्हाण यांना मिळाली व त्यांनी पाठलाग करून खाजगी वाहन पकडून प्रकरणाची माहिती मेहकर पुरवठा विभागाला दिली. हिवरा आश्रम येथे खाजगी वाहन क्रमांक एमएच ३१ सी क्यु ८४१९ थांबवून पोलिसांना माहिती देण्यात आली. पुरवठा निरीक्षण अधिकारी गजानन टेकाळे यांच्या तक्रारीवरून खाजगी वाहन रेशनच्या तांदुळासह जप्त करण्यात येऊन साखरखेर्डा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहकर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाहने फिरवून रेशनचा तांदूळ १० रुपये किलो दराने खाजगी खरेदीदार ‘खरेदी करतात व मेहकर येथील जानेफळ मार्गावरील परकुलमधील एका ठिकाणी संकलित करण्यात येतो आणि अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख शहरातील मोठ्या व्यापार्‍यांना विकण्यात येतो. या तांदुळाला ३० ते ३५ रुपये भाव मिळतो, अशी माहिती आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
————–

Share This Article
Exit mobile version