आरोग्य विभागाचा चार्ज डॉ. पिंपळे की दुधभाते?

editor 1 Min Read
1 Min Read

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना तडकाफडकी निलंबित केल्यामुळे त्यांच्या जागी आरोग्य विभागातील डॉ. अनिरुद्ध पिंपळे किंवा डॉ.बिराप्पा दुधभाते यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी पिंपळे यांनी कोरोना काळात केलेले उल्लेखनीय कार्य व आरोग्य विभागातील सेवा ज्येष्ठता पाहाता डॉ. पिंपळे यांच्याकडेच चार्ज देण्यात यावा, अशी अपेक्षा जिल्ह्यातील वैद्यकीय कर्मचारी व्यक्त करत आहेत.

आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांची नियुक्ती गडचिरोली येथील मुख्यालयामध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे आता सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाला आरोग्य अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार, असा प्रश्न पडला असला तरी डॉ. पिंपळे आणि दुधभाते यांच्या नावाची चर्चा सध्या आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील जाधव यांना निलंबित केल्यामुळे आता सोलापूरकडे आरोग्य मंत्री यांनी चांगलेच लक्ष दिले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कामचुकार आणि कामात हाय गय करणार्‍या कर्मचार्‍यांची गई केली जाणार नसल्याचे दिसत आहे. जाधव यांचे निलंबन झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या सांख्यिकी विभागाने शासनाकडे पदभार देण्याबाबत सूचना मागविले आहेत. डॉ. पिंपळे किंवा दुधभाते यांच्याकडे पदभार देण्याची शक्यता आहे.
—————

Share This Article
Exit mobile version