दर्शनाळ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुमित बिराजदार

editor 1 Min Read
1 Min Read

सोलापूर (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुमित बिराजदार यांची तर व्हाईस चेअरमनपदी नागनाथ व्हनमुर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या संस्थेची निवडणूक गेल्या अनेक वर्षांपासून बिनविरोध पार पडत आहे. यावेळी देखील ज्येष्ठ नेते तुकाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली होती. गुरुवारी यानिमित्त कार्यक्रम घेऊन नुतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटिल, जेष्ठ नेते बलभीम शिंदे, माजी सभापती संजीवकुमार पाटिल, दत्ताअण्णा तानवडे, नगरसेवक डॉ. किरण देशमुख,  बाळासाहेब मोरे, विलास गव्हाणे, भिमाशंकर जमादार, सुधीर लांडे, आण्णाराव विभुते, विश्वनाथ भरमशेट्टी,  सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह गावातील प्रमुख नेतेमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नूतन चेअरमन बिराजदार म्हणाले की, गावाने ज्येष्ठ नेते तुकाराम बिराजदार व माझ्यावर जो विश्वास टाकला आहे विश्वास पूर्णत्वास नेणार आहे आणि शेतकरी सभासदांना योग्य न्याय देण्याबरोबरच पारदर्शी व्यवहार यावर भर देणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.

Share This Article
Exit mobile version