वासनांध बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

editor 3 Min Read
3 Min Read

अकोला(जिल्हा प्रतिनिधी) अस म्हणतात न बाप मुलापेक्षा आपल्या मुलीला जास्त जीव लावतो तर मुलगी सुद्धा आई पेक्षा बापावर विश्वास ठेवते. मात्र याच बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना मूर्तिजापूर तालुक्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी माहेरी गेल्याचे पाहून वासनांध बापाने वासनेची भूक भागविण्यासाठी स्वतच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची शिकार करीत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. नराधम बाप एवढ्यावरच न थांबता वारंवार तिच्यावर झोपडीत लैंगिक अत्याचार केला. या अत्याचाराने अल्पवयीन मुलगी 5 महिन्याची गर्भवती राहिली. प्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी नराधम बापाला मध्यप्रदेश मधून अटक केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील एका तालुक्यातील एक कुटुंब मजुरीसाठी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील एका शेत शिवारात गेले. तेथेच त्यांनी झोपडी बांधून राहत असत आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत. यावेळी 15 वर्षीय मुलगी सुद्धा आई वडिलांसोबत राहत होती. दरम्यान मुलींची आई माहेरी गेली असता मुलगी एकटीच घरी होती. पत्नी माहेरी गेल्याने घरी कोणी नसल्याची संधी साधत वासनांध नराधम 40 वर्षीय बापाने स्वतच्या पोटच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. आणि याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास जिवे मारून टाकेल अशी धमकीच नराधम बापाने मुलीला दिली. जीवाच्या भीतीपोटी मुलीने झालेला अत्याचार कोणाला सांगितला नाही . त्यामुळे नराधम बापाने हा खेळ सुरूच ठेवला . कशी पत्नी कामाला गेली की कधी माहेरी गेली की नराधम बाप मुलीवर बळजबरीने अत्याचार करायचा. वारंवार अत्याचार केल्याने मुलीस गर्भधारणा झाली. यावेळी मुलीने पोट दुखत असल्याचे तिच्या आईला सांगितले असता आईने तिला मूर्तिजापूर येथील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी अल्पवयीन मुलीची तपासणी केली असता ती 5 महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले . यावेळी मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला असता तिला धक्काच बसला. त्यामुळे तिला विचारणा केली असता तिने घरी कोणी नसल्याचे पाहून बापाने अत्याचार केल्याचे सांगितले. यावेळी नराधम बापाला वाटले आता आपला कारनामा उघड होणार त्यामुळे बाप फरार झाला. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी नराधम 40 वर्षीय बापा विरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दखल केला. मूर्तिजापूर पोलिसांनी गुन्हा दखल करून तपास सुरू केला. यासाठी ठाणेदारांनी वेगळी वेगळी 3 पथके नेमली. यावेळी पोलिसांना नराधम बाप मध्यप्रदेश मधे असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी मध्यप्रदेश मधे जाऊन नराधम अत्याचारी बापाला अटक केली. पोलिसांनी नराधम बापास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 21 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share This Article
Exit mobile version