झेडपी सीईओ स्वामी रजेवर, मनीषा आव्हाळे यांच्याकडे पदभार

editor 1 Min Read
1 Min Read

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी प्रशिक्षणासाठी एक महिना रजेवर जाणार असून, त्यांच्याकडील पदभार मनीषा आव्हाळे यांच्याकडे देण्यात आला आहे, असे परिपत्रक विभागीय आयुक्त सौरव राव यांनी काढले आहे.

सीईओ स्वामी यांना आयएएसचे प्रमोशन यापूर्वीच मिळाल्याने प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे.  प्रशिक्षणाला जाण्यासाठी ते एक महिना रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार सोलापूर विभागाचे प्रांताधिकारी आव्हाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.  दरम्यान CEO स्वामी हे प्रशिक्षणासाठी जात असल्याने मंगळवारी दिवसभर त्यांनी विविध विभागाचा आढावा घेतला तसेच कामे पूर्ण करण्याच्या सूचना देखील दिल्या.

Share This Article
Exit mobile version