बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी)शेगाव येथील दुय्यम निबंधक वर्ग एक यांच्या तक्रारीवरून खोटी ओळख देवून प्लॉट विक्री प्रकरणात महिलेविरुद्ध शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक विजय जगन्नाथ सूर्यवंशी ४९ यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की ३ डिसेंबर २० २१ रोजी शेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात शेत सर्वे नंबर ३७६/१ मधील प्लॉट नंबर ४६ क्षेत्रफळ १५२. ५० चौरस मीटर या प्लॉटची खरेदी करून घेणार अंकुश भगवानराव जाधव व सौ सुरेखा विठ्ठल धामोडे हे आले होते खरेदी करून देणार सौ सुरेखा विठ्ठल धामोडे यांनी त्यांचे मुळ आधार कार्ड पॅन कार्ड दुय्यम निबंधक म्हणून सूर्यवशी यांनी तपासले त्याची छायांकित प्रत साक्षांकित करून घेतले व सौ सुरेखा विठ्ठल धामोडे यांना ओळखणारे दोन साक्षीदार यांनी सांगितले की ते सुरेखा धामोडे यांना ओळखतात त्यावरून प्लॉट क्रमांक ४६ शेत्रफळ १५२. ५० चौरस मीटर या प्लॉटची खरेदी करून दिली व खरेदी करून देणार व खरेदी करून घेणार असे दोघे कार्यालयातून निघून गेले याबाबत वर्तमानपत्रात बनावट महिलेला प्लॉट मालक म्हणून उपस्थित करून प्लॉट विकल्या संबंधी बातम्या प्रसिद्ध झाल्या.
सदर बातमी वाचून मूळ मालक असलेल्या सुरेखा विठ्ठल धामोडे यांचे लग्नानंतर चे नाव सुरेखा अशोक हागे राहणार मुक्काम पोष्ट येरडी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या दुय्यम निबंधक कार्यालयात हजर झाल्या. यांनी आवश्यक ते कागदपत्र सादर केल्यानंतर शेगाव दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक विजय सूर्यवंशी यांनी शेगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली त्यानुसार शहर पोलिसांनी आज १७ जून रोजी बनावट महिला नामसदस्य सुरेखा विठ्ठल धामोडे राहणार परवर पुरा इतवारी नागपूर विरुद्ध कलम ४२०,४६८,४७१ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डांगे साहेब करीत आहेत या घटने मतमुळे बनावट मालक उपस्थित करून प्लॉट विक्री करणाऱ्या दलाल लोकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

