बुलडाणा(जिल्हा प्रतिनिधी ) यश कंस्ट्रक्शन कंपनी व मेहकरचे माजी नगराध्यक्ष कासम गवळी, तत्कालीन मुख्याधिकारी तानाजी घोलप यांच्यासह ८ जनांनी संगनमत करून न.प. हिताकडे दुर्लक्ष करून कंपनीचा फायदा होईल व बांधकामाची मुभा देत न.प.च्या मालकीचे जागेवर अवैध बांधकाम करून संकुल बांधले. व त्यांनतर तत्कालीन न प.मुख्य लिपीक यांनी गाळेधारकांसोबत करार करून शासनाचा महसूल बुडवून करारा प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा एक रुपया कमी दराने भाडेपट्ट करून न.प.चे आर्थिक नुकसान केले. नगराध्यक्षांनी नातेवाईकांच्या नावे खाते उघडून गाळे वाटप करून भाडे घेवून भष्ट्राचार केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून माजी नगराध्यक्ष कासम गवळी मुख्याधिकारी तानाजी घोलप व वंâपनी संचालकांसह ८ जणाविरूध्द गुन्ह दाखल केले आहे.
प्राप्त माहिती नुसार अहमद शहा सबदर शहा, रा. वार्ड क्र. ९ रेहमत नगर, मेहकर, यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा येथे दिलेल्या तक्रारीत शासनाची परवानगी नसतांना नगराध्यक्ष, नगर परिषद, मेहकर व यश कंस्ट्रक्शन कंपनीने संगनमत करुन नप.मालकीच्या जागेवर अवैध बांधकाम करुन केलेल्या भ्रष्टाचारासंबंधाने व अन्य तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीवरून उघड चौकशी करुन अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचेकडून प्राप्त झाले होते.
प्राप्त आदेशानुसार बुलडाणा एसीबीने तक्रारीची सखोल चौकशी केली असता माजी नगराध्यक्ष कासम पिरु गवळी, तत्कालीन मुख्याधिकारी तानाजी बापू घोलप, यांनी पदावर कार्यरत असतांना, न.प. मालकीच्या गट क्रमांक ३० मधील ०.३३ हेक्टर जागेवर बांधा, वापरा व हस्तांतरण करा या तत्वावर दुकान संकुलाचे बांधकाम करण्यासाठी यश कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत संगनमत करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ४९(क) व कलम ९२ तसेच नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचे परीपत्रक दिनांक ९ जून २००९ मधील तरतुदींचे उल्लघन करुन व अधिकाराचा गैरवापर करुन बांधकामासंबंधाने निविदा प्रक्रिया पार पाडली. निविदा सूचनेत मागील वर्षाच्या बाजारमूल्यावर आधारित व अनुज्ञेय असलेल्या १.५ चटई क्षेत्र निर्देशांकाऐवजी १ चटई क्षेत्र निर्देशांक ग्राह्य धरुन प्रिमीयम रक्कम निश्चित केली व त्याद्वारे न.प. चे आर्थीक नुकसान करुन कंत्राटदारांना स्वस्तात जमीन उपलब्ध दिली. मर्जीतील कंत्राटदारांना टेंडर देत यावे या उद्देशाने निविद सूचनेत निविदा धारकांसाठी बांधकामाचा पूर्वानुभव, आर्थिक क्षमता इत्यादी बाबत अहर्ता तपासणी जाणीव पूर्वक टाळली. निवीदा सूचना प्रसिध्दी नंतर २४ सप्टेंबर २०१२ रोजी माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांचा भाचा सलीम गवळी व त्यांच्या ४ सहकारयांनी यश कंस्ट्रक्शन कंपनी, अकोला या नावाने करारनाम्याव्दारे पार्टनरशिप फर्मची स्थापना करून निविदा प्रक्रीयेत भाग घेतला व दिनांक २८ सप्टेंबर २०१२ रोजी सदर कंपनीला दुकान संकुल बांधकामाचे टेंडर देण्यात आले. २८ सप्टेंबर २०१२ रोजीच न.प. व यश कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये बी.ओ.टी. तत्वावरील दुकान संकुल बांधकामाचा करारनामा करून न.प.आर्थिक हिताकडे दुर्लक्ष करुन कंपनीस लाभ व्हावा या हेतुने गाळेवाटप व भाडेपट्टयासंबंधाने तरतुदी केल्या आल्या. शासनाची पूर्वपरवानगी पूर्वीच २२ एप्रिल २०१३ रोजी यश कंस्ट्रक्शन कंपनीस बांधकामासाठी मुभा दिली. तत्कालीन मुख्य लिपीक पवन भादुपोता, यांनी यश कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून, महाराष्ट्र मुद्रांक कायदा कलम ५२ब(ब) व भारतीय नोंदणी कायदा-१९०८ कलम १७ मधील तरतुदींचे उल्लंघन करारनाम्यामध्ये निश्चित केलेल्या प्रती स्क्वेअर फुट दरापेक्षा एक रुपया कमी दराने भाडेपट्टा करारनामे करून दरमहा १७ हजार ६५० रुपयाप्रमाणे न.प.चे आर्थिक नुकसान केले. तसेच गाळे वाटप करतांना नगराध्यक्ष कासम गवळी व सलीम गवळी यांच्या नातेवाईकांच्या नावाने बँक खाते उघडून व त्यामधे रोखीने रक्कमा जमा करुन यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खात्यात वळवून नातेवाईकांच्या नावे एकूण ४५ गाळ्यांचे करारनामे करीत गाळ्यांचे उत्पन्न सलीम वळी व कासम गवळी घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यावरूयावरून बुलडाणा एसीबीने माजी नगराध्यक्ष कासम गवळी, तत्कालीन मुख्याधिकारी तानाजी घोलप, तत्कालीन मुख्य लिपीक पवन भादुपोता, यश कंपनी संचालक शंकरलाल हसमुख काबरा रा. अकोला, सलीम इमाम गवळी रा शिरपूर जैन, मनीष सुभाषचंद्र लढ्ढा रा अकोला, उदय बालकीसन सोनी रा मेहकर, अशोक शंकरलाल हेडा रा वाशिम यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम -१९८८ कलम १३(२) सहकलम १३(१)(क)(ड) व भारतीय दंड संहिता कलम १२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अॅन्टी करप्शन ब्युरा, बुलडाणा पोनि सचिन इंगळे करीत आहे.

