दम असेल तर कोणत्याही चौकात भेट, सोलापूरचा ढाण्या वाघ अतुलराजे भवर यांनी आ. संजय गायकवाड यांना ललकारले!

editor 1 Min Read
1 Min Read

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना शिवराळ भाषा वापरत, त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना सोलापूरचा ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे कट्टर शिवसैनिक अतुलराजे भवर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, व नांगडं करून मारण्याची भाषा करत, ललकारले आहे. आ. संजय गायकवाड यांची शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासमोर उभं राहण्याची औकात नाही. तुझ्यात दम असेल तर कुठल्याही चौकात बोलावं, मी येतो, अशा शब्दांत अतुलराजे भवर यांनी आ. गायकवाड यांना आव्हान दिले. त्यामुळे संजय गायकवाडविरुद्ध कट्टर शिवसैनिक अतुलराजे भवर यांच्यातील शाब्दिक संघर्ष कोणत्या टप्प्यावर जाऊन पोहोचतो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आमदार गायकवाड हे अतुलराजे यांना उत्तर देतात की नाही, याकडेदेखील महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

Share This Article
Exit mobile version