विविध समस्यांबाबत शासकीय वसतीगृह विद्यार्थ्यांचे तहसीलसमोर धरणे आंदोलन

editor 1 Min Read
1 Min Read

नंदुरबार : (जिल्हा प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील मोहिदा आदिवासी शासकीय वस्तीगृहात अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. वसतिगृहाचे वार्डन राहत नसल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाणी, आंघोळीच्या पाणी आणि घाणाचे साम्राज्य असे अनेक तक्रारी आहेत. मात्र अनेकदा तक्रार करून देखील या विषयांवर कोणीही दखल घेत नसल्याने आज 18 जून रोजी अखेर विद्यार्थ्यांनी शहादा तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन केले आहे.

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आला असून मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी होते. शासकीय आदिवासी वस्तीगृह वार्डन नेहमी गैरहजर राहत असून तक्रारी नेमका कोणाकडे करावा असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला असतो वेळेवर पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत आणि कॉलेजमध्ये आता येत नाही. त्यामुळे अनेकदा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत निवेदन दिला आहेत मात्र ते दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांनी आज शेवटी आंदोलनाच्या हत्यार हाती घेण्यात आला आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून या आंदोलनात मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version