बॅगा हिसकावून पळणार्‍या तिघींच्या मुसक्या आवळल्या!

editor 1 Min Read
1 Min Read

– पिंपळनेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केल्या तीन परप्रांतीय महिला

धुळे (ब्युरो चीफ) – पिंपळनेर शहरासह परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगत नागरिक भयभीत झाले होते. बाजारपेठ, बसस्थानकासह गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या अंगावरील दागिने, हातातील ऐवज लुटून नेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयितांवर लक्ष केंद्रित केले.

याचदरम्यान बसस्थानक परिसरात दुकानातून बाहेर जाणार्‍या ५० वर्षीय महिलेच्या हातातील बॅग हिसकावून अज्ञात तीन महिलांनी पळ काढला. याबाबत पिंपळनेर पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती जाणून घेतली असता, त्या तीनही महिला परप्रांतीय असल्याचे समोर आले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिघांना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडून लुटीचा ऐवज मिळून आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्याकडून अजूनही काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पिंपळनेर पोलिसांनी वर्तवली आहे.

————

Share This Article
Exit mobile version